यादोगोपाळ पेठेतील कोसळलेली जुनी इमारत

सातारा : येथील यादोगोपाळ पेठ सर्वे नंबर 344 येथील तब्बल 80 वर्षांपूर्वी जुनी ची लक्ष्मी निवासी इमारत सायंकाळी पावणे सहाच्या दरम्यान अचानक कोसळली. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने इमारत रिकामीच असल्याने जीवित हानी झाली नाही या इमारतीच्या लगत असलेल्या दुसर्‍या इमारतीच्या विकसन प्रक्रिया दरम्यान ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. घटनास्थळी नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती.

सुरक्षिततेचा उपाय म्हणून सातारा पालिकेच्या वतीने तात्काळ इमारत उतरवण्याचे काम हाती घेण्यात आले होते. शहर विकास विभागाचे पथक तेथे घटनास्थळी दाखल झाले होते. सातारा पालिकेने शहरातील धोकादायक इमारतींना यापूर्वी 53, 54 च्या नोटिसा बजावल्या आहेत. यादोगोपाळ येथील पेठेत जुन्या चित्रा टॉकीज परिसरातील लक्ष्मी निवास ही इमारत सायंकाळी सहाच्या दरम्यान अचानक कोसळल्याने परिसरात मोठा आवाज झाला. यामुळे नागरिकांची एकच पळापळ झाली. पोलीस व नागरिक यांची समर्थ मंदिर परिसराकडे जाणार्‍या रस्त्यावर गर्दी झाली होती. सुदैवाने ही इमारत मोकळीच असल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. सातारा पालिकेने यापूर्वीच इमारत धोकादायक म्हणून जाहीर केली होती. ही इमारत तब्बल 80 वर्षापूर्वीची होती.

लाकडी कडेपाट आणि मातीचे बांधकाम असलेल्या या इमारतीचा निवासी वापर यापूर्वी संपुष्टात आला होता. सर्वे नंबर 344 मध्ये असणारी ही इमारत दुमजली होती. त्या लगत दुसर्‍या एका इमारतीचे खोदकाम सुरू होते. पायासाठी येथे जमीन आठ ते दहा फूट जमीन खणण्यात आली होती. इमारत कोसळताना आवाज झाल्याने प्रत्यक्षदर्शी इतरत्र धावले. यावेळी नव्या इमारतीसाठी येथे आठ कामगार काम करत होते. मात्र मातीच्या भरावाने ट्रॅक्टर ट्रॉली भरण्यासाठी रस्त्यावर आल्याने आणि त्याचवेळी इमारत कोसळली म्हणून सुदैवाने कामगार बचावले. या इमारती लगतच्या दुसर्‍या निवासी इमारतीचे फारसे नुकसान झाले नाही. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पथक रवाना केले. तर सातारा पालिकेचे शहर विकास विभागाचे कर्मचा घटनास्थळी दाखल झाले या इमारतीचा पडलेला भाग तात्काळ सुरक्षित स्थळी हटवणार असल्याची माहिती मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी दिली आहे.

By Admin

You cannot copy content of this page