सातारा : मारहाण प्रकरणी दोन जणांविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 11 रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास हॉर्न वाजवण्याच्या रागातून गौरव अनिल नगरे रा. झरेवाडी, पोस्ट करंडी, ता. सातारा आणि त्याचा भाऊ अभिजीत यांना टोच्याने आणि कोयत्याच्या उलट्या बाजूने मारहाण केल्याप्रकरणी करण जगन्नाथ चव्हाण आणि विशाल भोसले दोन्ही रा. डबेवाडी, ता. सातारा यांच्या विरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार निकम करीत आहेत.

By Admin

You cannot copy content of this page