सातारा : जुन्या भांडणाच्या कारणातून गोडोली येथील वनविभाग परिसरात दोन गटात भांडणे झाली. एकमेकांना मारहाण करत राडा झाल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात परस्पर तक्रारी दाखल झाल्या आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संजय प्रल्हाद बागाव (वय 54, रा. जळगाव ता.कोरेगाव) यांनी मारहाण झाल्याप्रकरणी समीर मोहिते व त्याचे दोन साथीदार यांच्या विरुध्द तक्रार दिली आहे.

दुसरी तक्रार समीर धनाजी मोहिते (वय 22, रा. नागठाणे ता.सातारा) यांनी ओम बागाव, हर्ष बाबर व अनोळखी एकाविरुध्द दिली आहे. ही घटना दि. 19 मे रोजी सातार्‍यातील वनविभाग परिसरात घडली आहे. संशयितांनी एकमेकांना लाथा-बुक्क्या, विटांनी, दगडाने मारहाण करत दमदाटी, शिवीगाळ केली आहे.

By Admin

You cannot copy content of this page