महाराष्ट्राचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री जयकुमार गोरे यांनी काल नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीत जिहे कठापूर आणि उरमोडी पाणी योजना, म्हसवड एमआयडीसी तसेच राज्यातील महत्त्वाच्या प्रकल्पांच्या कामांना गती देण्याविषयी सविस्तर चर्चा झाली.

यावेळी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर उपस्थित होते. पंतप्रधानांबरोबर झालेल्या भेटीत माण-खटाव मतदारसंघातील म्हसवड येथील औद्योगिक वसाहतीला राज्यशासनाने मंजुरी देऊन जमीन अधिग्रहणासाठी एक हजार कोटींची तरतूद केलीआहे.

By Admin

You cannot copy content of this page