सातारा: खंडाळा येथे १४ वर्षीय शाळकरी मुलगी अनुष्का राकेशकुमार भांबरे (वय १४) हिचा गळा चिरलेल्या अवस्थेतील मृतदेह बाथरूममध्ये आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

ही मुलगी जळगावची असून, तिचे कुटुंब गेल्या पाच वर्षांपासून खंडाळ्यात राहत होते. अनुष्काने आत्महत्या केली की तिचा खून झाला, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.

खंडाळा पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद घेण्याची प्रक्रिया रात्री उशिरा सुरू होती.

By Admin

You cannot copy content of this page