सातारा : आमच्या शरद पवारसाहेबांचा दुटप्पीपणा बघा. कोल्हापूरला जातात अन त्या ठिकाणी सांगतात शाहू महाराज यांच्या विरोधात तुम्ही उमेदवार उभा केला. हे किती चुकीचे आहे. त्यांना तुम्ही त्याठिकाणी बिनविरोध निवडून द्यायला पाहिजे होते. मग साताऱ्यात हे छत्रपती उदयनराजे महाराज नाहीत का? हे तुम्हांला का नाही आठवलं. जर तुम्हांला कोल्हापूरला आठवते तर साताऱ्यात का नाही आठवत? तुम्ही म्हणायला पाहिजेहोते. साताऱ्यात या गादीचा मान आहे. इथे छ. उदयनराजे उभे आहेत मी उमेदवार उभा करणार नाही, पण त्यांनी असा उमेदवार उभा केला की, ज्याने शौचालयातही पैसे खाल्ले. छ.उदयनराजे यांच्या विरोधात उमेदवार उभा करायचा होता तर किमान त्या तोडीचा तर उमेदवार उभा करायला हवा होता. त्यामुळे आता तुतारीची पिपाणी होणार आहे. अन साताऱ्याचे छ. उदयनराजे भोसले हेच तुतारीची पिपाणी केल्याशिवाय राहणार नाहीत, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, 60 कोटीपेक्षा अधिक लोकांना मोदी यांच्या गॅरंटी मुळे 10 लाखाच कर्ज मिळत आहे. आता ते 20 लाख करण्याचे उद्दिष्ट आहे. महिलांनाअधिकार देण्याचे काम करावे लागत आहेत.यापुढे 33 टक्के महिलांना संधी मिळणार आहे. आज लाखो अनुसूचित जातीचे लोक उद्योजक झाले आहेत. मोदी यांनी वन रँक वन पेन्शन योजना सैनिकांना सैनिकांना दिली. आज महाराष्ट्राला 50 हजार कोटी दिले तर सातारा जिल्ह्यात 48 हजार हेक्टर जमीन ओलिताखाली आणली आहे. कोरेगावात एका शिंदेंना पाणीदार आमदार केले, तर दुसऱ्याला हद्दपार केले. आता उदयनराजे त्यांना कायमचे हद्दपार करतील.

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, आजची विराट सभा पाहिल्यानंतर आता माझ्या मनामध्ये उदयनराजे मोठ्या मताधिक्क्याने निवडून येण्यामध्ये कोणतीही शंका नाही. आज साताऱ्यात दुसरीकडे सभा सुरु आहे, पण त्यामध्ये एका कोपऱ्याएवढी लोक नाहीत. सातारा जिल्हा लढणारा आहे. आज सीमेवर लढणारे याच जिल्ह्यातील सर्वाधिक लोक आहेत. आज विकास कसा घडवायचा आहे, याची ब्ल्यू प्रिंट छ. उदयनराजे, शिवेंद्रसिंहराजे यांच्याकडे आहे. ज्यावेळी आपण आयटी हबची मागणी करता म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदीनी आयटी हब केले आहे. हे आज संपूर्ण देशाला ज्ञात झालं आहे. आयटी पार्क किंवा सातारकरांसाठी वंदे भारत ट्रेन सुरु करायचीअसेल तर यासाठी नरेंद्र मोदी यांच्या समवेत छ. उदयनराजे यांनाही पाठवावे लागेल. देशाची किल्ली आपणाला याच माध्यमातून मिळणार आहे.

By Admin

You cannot copy content of this page