
सातारा : खासदार उदयनराजे भोसले यांचे कट्टर समर्थक व यशस्वी उद्योजक अक्षय मतकर यांना प्रभाग क्रमांक सात मधून जवळपास उमेदवारी निश्चित झाल्याची माहिती आहे. यामुळे मतकर मित्र परिवारामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे .प्रभाग क्रमांक सात मधून नव्या चेहऱ्याला संधी मिळणार असल्यामुळे येथील प्रभागाच्या समस्या सुटण्यास मदत होईल असा विश्वास नागरिक व्यक्त करत आहे.
अक्षय मतकर यांनी गेल्या तीन वर्षापासून प्रभागात मोर्चे बांधणी सुरू ठेवली होती .कोविडच्या काळामध्ये अनेक गरजू रुग्णांना त्यांनी सढळ हाताने मदत केली .याशिवाय प्रभागात वाढता जनसंपर्क कायम ठेवत वेगवेगळ्या प्रश्नांवर तोडगा काढण्याचे सुद्धा त्यांनी काम केले .प्रभाग क्रमांक सात मध्ये नवीन चेहरा आणि प्रश्नांची जाण असणारा माणूस याला संधी मिळावी अशी येथील नागरिकांची मागणी होती .सातारा विकास आघाडीचे अध्यक्ष खासदार उदयनराजे भोसले यांनी जनमताचा कानोसा घेत अक्षय मतकर यांना संधी देण्याचे धोरण निश्चित केले आहे याबाबतची अधिकृत घोषणा झाली नसली तरी अक्षय मतकर यांच्या नावाला पाठिंबा वाढत आहे .
प्रभाग क्रमांक सात हा निम्न कष्टकरी वर्गाचा तसेच पांढरपेशा वर्गाचा मिळून हा प्रभाग बनला आहे प्रभागाचे मतदान जवळपास साडेसहा हजार इतके आहे त्यामुळे शेंडे कॉलनी ते होळीचा टेक यादरम्यानच्या प्रभागांमध्ये स्वच्छ पाणीपुरवठा वाढती अतिक्रमणे तसेच नागरिकांच्या पायाभूत सुविधांच्या समस्या अशा अनेक अडचणी आहेत. शेंडे कॉलनी लगतचा आणि अर्थशाला नगर अंजली कॉलनी या प्रभागातही अक्षय मतकर यांचा उत्तम जनसंपर्क आहे. खासदार उदयनराजे भोसले यांच्याकडे मतकर यांनी आपल्या विविध सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून चांगलीच मोर्चेबांधणी केली होती या प्रयत्नांना आता यश येताना दिसत आहे.
