शुक्रवार पेठ बदामी विहीर येथील सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे कट्टर समर्थक म्हणून मागील बऱ्याच वर्षांपासून ओळखले जाणारे मूर्तिकार पोपट (आबा)कुंभार यांचे नाव सध्या सातारा शहराच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चेत आहे. सातारा नगरपालिकेत स्वीकृत नगरसेवक पदी त्यांची वर्णी लागण्याची दाट शक्यता असून, गडकरआळी शुक्रवार पेठ बदामी विहीर विकास मंडळ नागरिकांकडून यासाठी उघडपणे मागणी होत आहे.

विशेष म्हणजे नगरसेवक पद नसतानाही मूर्तिकार पोपट (आबा ) कुंभार यांनी गेल्या 12 वर्षांत परिसरात विविध सामाजिक, नागरी व जनहिताची कामे सातत्याने केली आहेत. सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी ते कायम पुढे राहिले असून, त्यांच्या कामाची दखल आज बदामी विहीर विकास मंडळाचे नागरिक घेताना दिसत आहेत.यंदाच्या निवडणुकीत पोपट(आबा )कुंभार स्वतः उमेदवारी करण्याच्या तयारीत होते. मात्र सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या सांगण्यावरून त्यांनी आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतला. पक्षशिस्त व नेतृत्वावर विश्वास ठेवत घेतलेल्या या निर्णयामुळे आता नागरिकांमध्ये एकच सूर उमटत आहे.

“त्याग करणाऱ्या कार्यकर्त्याला योग्य संधी मिळायलाच हवी.” त्यामुळे पोपट (आबा) कुंभार यांना सातारा नगरपालिकेत स्वीकृत नगरसेवक पदी संधी देऊन त्यांच्या सामाजिक कार्याला अधिकृत व्यासपीठ मिळावे, अशी ठाम मागणी गडकर आळी, शुक्रवार पेठ, बदामी विहीर विकास मंडळ येथील नागरिक करत आहेत. आता या अपेक्षांना मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले कसा प्रतिसाद देतात, याकडे सातारा शहराचे लक्ष लागून राहिले आहे.

By Admin

You cannot copy content of this page