
सातारा:आपल्या हटके स्टाईलने आणि दिलखुलास व्यक्तिमत्त्वाने तरुणांच्या गळ्यातील ताईत बनलेले, सातारा गादीचे थेट १३ वे वंशज खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचा वाढदिवस आज अत्यंत साधेपणाने आणि सामाजिक भावनेतून साजरा करण्यात आला.राज्याचे उपमुख्यमंत्री आणि महाराज साहेबांचे निकटवर्तीय मित्र अजितदादा पवार यांच्या आकस्मिक निधनामुळे, उदयनराजेंनी आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय आधीच जाहीर केला होता.
“कोणीही हार-तुरे किंवा शुभेच्छांचे फलक (बॅनरबाजी) लावून नये,” असे आवाहन त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केले होते. राजांच्या या सूचनेचा आदर करत सातारा शहरात कुठेही गाजावाजा न करता विधायक कामांवर भर देण्यात आला.संकटाच्या काळात सामाजिक मदतीचा हातउदयनराजेंचे जिवलग मित्र आणि शिक्षण क्रीडा सभापती शंकर किर्दत यांनी महाराजांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्रभागामध्ये विविध सामाजिक उपक्रम राबवले. ‘एक हात मायेचा, एक हात आपुलकीचा’ ही भावना जपत त्यांनी खालील कार्ये पार पाडली:
शैक्षणिक मदत: गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना शालेय वह्या पेन पुस्तकांचे वाटप करण्यात आले.स्वच्छता अभियान: प्रभागामध्ये विशेष स्वच्छता मोहीम राबवून स्वच्छतेचा संदेश दिला.अन्नदान: मतिमंद मुलांच्या शाळेत आणि अनाथाश्रमात मुलांना अन्नदान करून त्यांच्यासोबत आनंद साजरा केला.
गो-सेवा
गोशाळेतील गाईंना चारा उपलब्ध करून देऊन मुक्या प्राण्यांप्रती आपली कृतज्ञता व्यक्त केली.”महाराज साहेबांनी दिलेल्या सूचनेनुसार, आम्ही उत्सवी स्वरूपात वाढदिवस साजरा न करता समाजातील शेवटच्या घटकाला मदत करून हा दिवस सार्थकी लावला आहे,” असे मत यावेळी शंकर किर्दत यांनी व्यक्त केले.
राजसाहेबांच्या या निर्णयाचे आणि कार्यकर्त्यांच्या सामाजिक उपक्रमांचे सातारा जिल्ह्यात सर्वत्र कौतुक होत आहे.

