सातारा : पुढील सुनावणी 11 जुलैला संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या महाबळेश्वर तालुक्यातील झाडानी येथील 640 एकर जागा खरेदी प्रकरणी गुजरातचे जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवी यांच्यासह त्यांचे कुटुंबीय आज सातारा जिल्हाधिकारी कार्यालयातील अप्पर जिल्हाधिकारी जीवन गलांडे यांच्या दालनात या प्रकरणाच्या सुनावणीसाठी हजर झाले होते. परंतु अप्पर जिल्हाधिकारी जीवन गलांडे हे अचानक महसूल मंत्र्यांबरोबर लागलेल्या मंत्रालयातील बैठकीमुळे मुंबईला गेले असल्याने आता गुरुवार दि 11 जुलै यापुढील सुनावणी होणार आहे. याप्रकरणी आपण प्रशासनास संपूर्ण सहकार्य करू असे गुजरातचे जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. तर तक्रारदार सुशांत मोरे यांनी सांगितले की अकरा तारखेला आपले म्हणणे मांडण्याचे सर्वांना प्रशासनाने सांगितले आहे.

सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यात कोयना जलाशयाच्या काठावर असलेल्या सह्याद्रीच्या वनविभागाच्या अंतर्गत असलेल्या झाडानी गावातील 640 एकर जमीन ही तेथील शेतकऱ्यांना फसवून गुजरातचे जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवी, अनिल वसावे, पियुष बोंगिरवार व त्यांच्या कुटुंबीयांनी घेतल्याचे प्रकरण सध्या गाजत आहे.

यासंदर्भात सर्वत्र जोरदार चर्चा झाल्याने व तक्रारीहीवाढल्याने याप्रकरणी सातारचे जिल्हाधिकारी जितेंद्रडुडी यांनी अप्पर जिल्हाधिकारी जीवन गलांडे यांनायाप्रकरणी चौकशी करण्याचे आदेश दिले व त्यानुसारअप्पर जिल्हाधिकारी यांनी संबंधितांना नोटीसा काढल्या होत्या. त्यानुसार आता चंद्रकांत वळवी व त्यांचे सहकारी हे स्वतः अप्पर जिल्हाधिकारी यांच्या दालनात हजर झाले होते.

अप्पर जिल्हाधिकारी यांच्या दालनात अव्वल कारकूनजयंत वीर यांनी याप्रकरणी उपस्थित असलेल्यासर्वांना सांगितले की अप्पर जिल्हाधिकारी हे मुंबईत महसूल मंत्र्यांबरोबरील बैठकीला गेले असल्याने आजच्या ऐवजी पुढील सुनावणी ही गुरुवार 11जुलै रोजी होईल. गुरुवार दि. 11 जुलै रोजी सर्वांनीउपस्थित राहण्याचे आदेशही संबंधितांना देण्यात आलेले आहेत व त्यांचे म्हणणे मांडण्यास सांगितले आहे.अप्पर जिल्हाधिकारी यांच्या दालनातून बाहेर पडल्यानंतर गुजरातचे जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की सरकारी प्रक्रियेचे पूर्णपणे मी पालन करणार आहे. तसेच शासनाला चौकशीकामी सहकार्य करणार आहे.बाकी काहीही बोलण्यास त्यांनी नकार दिला.

दरम्यान तक्रारदार माहिती अधिकार कार्यकर्ते सुशांतमोरे यांनी यासंदर्भात बोलताना सांगितले की गुरुवार दि. 11 जुलै रोजी पुढील सुनावणी होणार असून त्यावेळी प्रत्येकाला त्यांचे म्हणणे मांडण्यास सांगितले आहे.

गेल्या तारखेच्या वेळी जीएसटी आयुक्त चंद्रकांतवळवी व त्यांचे सर्व सहकारी यांचे वकीलपत्र चौकशीच्या वेळी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी रद्द केले होते आणि त्यांच्या विरोधात तक्रारी आहेत त्यांना समक्ष उपस्थित राहणे आदेश दिले होते.त्यानुसार आजच्या तारखेला हे सर्वजण उपस्थित होते. चंद्रकांत वळवी व त्यांच्या पत्नी, पीयुष बोंगीरवार व त्यांच्या पत्नी, अनिल वसावे व त्यांच्या पत्नी, तसेच तक्रारदार सुशांत मोरे आणि एक जण असे आठ जण उपस्थित होते.

By Admin

You cannot copy content of this page