
सातारा : युवा नेतृत्व व सामाजिक कार्यकर्ते अजय जयसिंग कदम यांचा वाढदिवस मोठया जल्लोषात साजरा करण्यात आला. अनाथ निराधार मुलांच्या शैक्षणिक वाटचालीसाठी रयतच्या कर्मवीर भाऊराव पाटील अण्णा यांच्या पहिली शाळा धनीची बाग रयत शिक्षण संस्था शाखा क्रमांक 1 वसतिगृहातातील मुलांसाठी रोख पाच हजार रुपयांची मदत सोबत मिष्टान्न भोजन देत त्यांनी मूलासमवेत वाढदिवस साजरा केला.यावेळी संस्थेच्या वतींने अजय जयसिंग कदम यांचे स्वागत सत्कार करण्यात आला.
यावेळी, शिवसेना सातारा शहरसंघटक प्रणव सावंत,रविराज बंडदरे, शिवभक्त महेश कदम संजय प्रभुणे उमेश साळुंखे, निखिल इंदलकर, अभिषेक जांबळे, मित्रपरिवार, उवस्थित होते. यावेळी संस्थेचे सचिव प्रशांत गुजरे सरांनी मार्ग दर्शन केले,समाजातील अनाथ निराधार व पालक नसलेल्या पाल्यांना त्यांच्या शैक्षणिक वाटचालीसाठी भरीव योगदान अल्पशिक केलेली मदत त्यांच्या शैक्षणिक भवितव्यासाठी मोलाची ठरणार असल्याचं संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.
यावेळी अजय कदम हे युवा नेतृत्व तसेच सामाजिक कार्याचे आवड असणारे तरुण म्हणून त्यांच्या कार्याचा आढावा कार्यक्रमादरम्यान घेण्यात आला विद्यार्थ्यांसमवेत मिस्टन्न भोजन तसेच केक कापून हा अनोखा वाढदिवस साजरा झाल्याबद्दल सर्वांमध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले आपल्या समवेत केलेल्या वाढदिवसाचे आणि मिष्टान्न भोजनाबद्दल संस्थेच्या वतीने अजय कदम मित्र परिवाराचे आभार मानण्यात आले
