सातारा (प्रतिनिधी) : गोडोलीतील अनधिकृत अतिक्रमण केलेल्या पानटपरी चालकांनी नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या प्रमुखांच्या घरच्यांपेक्षा जोरदार वाढदिवस साजरा केला. या टपरीधारकाशी संबंध अधिक दृढ असल्याने आजपर्यंत अतिक्रमण विभागाकडून कारवाई केली जात नव्हती. आता हा वाढदिवस साजरा केल्याने शहरात चांगलीच चर्चा रंगली आहे.

गोडोलीतील रस्त्यावर अनधिकृतपणे पानटपरी टाकून गुटखा विक्री करणारा, रात्री उशिरापर्यंत मोठ्याने आवाजात गाणी लावून टपरी सुरू ठेवणाऱ्यांनी चक्क नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या प्रमुखांचा वाढदिवस साजरा केला. यावरुन शहरातील अतिक्रमणाला आतून वाव देणाऱ्या या विभाग प्रमुखाची पडद्या मागील भुमिका महत्त्वपूर्ण असते.गोडोलीतील हा टपरीधारक नेहमीच चमकोगिरी करत पोलीस, नगरपालिका, अन्य शासकीय अधिकाऱ्यांशी आपली चांगलीच गट्टी असल्याचे नेहमीच वाचाळ बोलत असतो.

अनधिकृत टपरीवर नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाची एकदाही कारवाई झालेली नाही. अनेक पोलिस कर्मचारी याच ठिकाणी गुटखा खरेदी करताना दिसतात. आजूबाजूच्या रहिवाशांना या टपरीवर येणाऱ्या भुरट्या, टवाळखोर, टपोरींच्या विक्षिप्त हावभाव, रात्री उशिरापर्यंत मोठ्याने आवाजात गाणी लावून दंगामस्ती, भांडणं याबाबत नाहक त्रास होतो. संबंध दृढ केलेल्या अधिकाऱ्यांचा वरदहस्त असल्याने या टपरीवर कारवाई केली जात नाही.

अतिक्रमण विभागाच्या प्रमुखांचा घरच्यांनी केला नाही,  एवढ्या उत्साहात अतिक्रमण केलेल्या पानटपरी चालकांनी वाढदिवस केलेले फोटो शहरात व्हाट्सअप वरती व्हायरल होऊ लागल्याने साताऱ्यात चर्चेला चांगलेच उधाण येऊ लागले आहे.

दम असणारा अधिकारी हवा…..

साताऱ्यात अतिक्रमण विभाग फक्त नावालाच, बॅनर वर कोणाचा फोटो,कोणाची नावे, पाहून आज पर्यंत कारवाई केली जाते हे सातारकरांनी पाहिले आहे. अतिक्रमण विभाग ठराविक दिवशी लावलेल्या बॅनरवर कोणतीच कारवाई करत नाही. शहरामध्ये गल्ली बोळात चौकाचौकात अतिक्रमणाचा विळखा दिवसेंदिवस वाढत असताना त्यावर कारवाई मात्र क्वचित केली जाते. नगरपालिकेच्या दारातच नेहमीच विनापरवाना बॅनर झळकतच असतात. यात फुटकळ कार्यकर्त्यांपासून ते ज्यांच्यावर मोका, तडीपार कारवाया तसेच अनेक गुन्हे दाखल आहेत. अशांचे बॅनर राजरोसपणे लावले जातात. पण त्यांच्यावर कारवाई करण्याचा दम असणारा आजपर्यंत पालिकेस अधिकारी लाभला नाही, सातारा शहरातील अतिक्रमण बोकळ्ण्यास जबाबदार असणारे अधिकारी कर्तव्यास कसूर करत असून त्यांच्यावरच कारवाई केल्याशिवाय अतिक्रमणावर हातोडा पडणार नाही.

By Admin

You cannot copy content of this page