सातारा -प्रतिनिधी कोरेगाव तालुक्यातील नागझरी गावाच्या हद्दीत जलसंधारण विभागाच्या परस्पर पाझर तलाव फुगवटा क्षेत्रात एकाने अनाधिकृत विहीर काढली.सदर विहीर काढताना दै.राजमुद्रा ने हे प्रकरण सचित्र उजेडात आणले.तेव्हा जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाचे कोरेगाव येथील उप अभियंत्यांनी संबंध विहीर मुजवण्यात यावी असा आदेश संबंधितासह ग्रामपंचायतीला काढला होता. त्यानंतर संबंधिताने तलाठ्यांला हातीशी धरून महसूल दप्तरी विहिर फुगवटा क्षेत्राबाहेर असल्याचे दाखवून ही नोंद केली. त्यावर कागदपत्रांची खातरजमा न करता महावितरणने वीज कनेक्शन जोडणी केली. गेल्या चार दिवसांपासून फुगवटा क्षेत्रात विहीर आणि विद्युत पुरवठा गेल्याने प्रकरण पुन्हा उजेडात आले.

नागझरी पाझर तलावाच्या फुगवटा क्षेत्रात कोणालाही बांधकाम सुरक्षिततेच्या दृष्टीने शासकीय नियमानुसार विहीर काढता येत नाही.जल संधारण विभागाच्या परवानगी शिवाय फुगवटा क्षेत्राचा वापर हा कायदेशीर गुन्हा ठरतो.तरीही पाझर तलावाच्या फुगवटा क्षेत्रात विहीर काढण्याचे धाडस केले.याच्या बांधकामा पासून राजमुद्रा ग्रुप ने ही वादग्रस्त विहीर मुजवण्यात यावी अशी मागणी केली होती.

पण जलसंधारण विभागाची परवानगी नाही, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने विहीर मुजवण्यात यावी असा आदेश दिला , तरी ही महसूल दप्तरी नोंद केली, सरपंच , ग्रामपंचायतीने कायदेशीर भुमिका वठवलीच नाही, महावितरणने वीज कनेक्शन दिले. अखेर पाझर तलावाच्या फुगवटा क्षेत्राची पुन्हा निसर्गाने हद्द दाखवत विहीर पाण्यात गेल्याने ती अनाधिकृत असल्याचे स्पष्ट झाले.

आता या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी राजमुद्रा ग्रुप ने केली आहे. भविष्यात या प्रकरणाचा कायदेशीर पाठपुरावा करत संबंधितांना अद्दल घडविण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली जाणार आहे.

क्षेत्रात विना परवाना काढलेली विहीर मुजवण्यात यावी, असा आदेश ग्रामीण पाणी पुरवठा उप अभियंता यांनी दिले होते . सरपंच आणि ग्रामपंचायतीने कायदेशीर भुमिका वठवलीच नाही. तर तलाठ्यांनी सदर विहीर तलावाच्या फुगवटा क्षेत्रात नाही, असे दप्तरी नोंद करून दिलेल्या कागदपत्रावर महावितरणने वीज कनेक्शन दिले. तर सदर विहीर मुजवण्यात यावी असे ग्रामपंचायतीला आदेश दिले असताना ही त्यावर कारवाई केली नाही. जलसंधारण विभागाची परवानगीने न घेता काढलेली अनाधिकृत विहीर तलावाच्या पाण्यात गेल्याने ती पुन्हा चर्चेत आली आहे. ग्रामीण पाणी पुरवठा, तलाठी, ग्रामपंचायत, महावितरण यांच्या “एकमेका साह्य करू” धोरणात अनाधिकृत अस्तित्व अखेर पाझर तलाव फुगवटा क्षेत्रात ती विहीर पाण्यात गेल्याने “अधिकाऱ्यांनी तारल आणि निसर्गाने चव्हाट्यावर आणलं” आता यावर कारवाई प्रशासनाकडून काय कारवाई होणार याची उत्सुकता लागली आहे.

“आंधळ दळतंय आणि..पीठ खातंय” असा प्रकार नागझरी येथील पाझर तलाव क्र.१ बाबतीत घडला आहे.’कधी काळी दुष्काळाच्या झळा असाह्य सोसणाऱ्या नागझरी (कोरेगाव) येथील जलसंधारण कामांतून उभारलेल्या पाझर तलावाच्या पाणी फुगावठा हद्दीत एकाने अनाधिकृत काढलेल्या विहीरीची हद्द आणि पुरक कागदपत्रांच्या सत्यतेची खातरजमा न करता तलाठ्यांनी ती विहीर दप्तरी नोंदणी केली. अखेर पाझर तलाव पाण्याने पुर्ण क्षमतेने भरल्यावर ती अनाधिकृत विहीर पाण्यात गेल्यावर हद्द , नोंद, विद्युत पुरवठा, नियमबाह्य ग्रामपंचायतीची भुमिका, अधिकाऱ्यांनी केलेली मदत याची पाण्यात गेल्याने पुन्हा ती विहीर चर्चेत आली आहे.

By Admin

You cannot copy content of this page