सातारा: दांम्पत्याला मारहाण केल्याप्रकरणी चौघांविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा शहरातील नामदेववाडी झोपडपट्टी परिसरात दांपत्याला मारहाण केल्याप्रकरणी चौघांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. कैलास सायबू पवार, सोन्या सायबू पवार, विलास सायबू पवार व अनिता कैलास पवार (सर्व रा. नामदेववाडी झोपडपट्टी) अशी त्यांची नावे आहेत.

याबाबत जयश्री अमोल पवार (रा. नामदेववाडी झोपडपट्टी) यांनी फिर्याद दिली आहे. संशयीतांनी मला व पतीला मारहाण केल्याचे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे. याबाबतचा अधिक तपास हवालदार राजगे करत आहेत.

By Admin

You cannot copy content of this page