सातारा प्रतिनिधी : सातारचे पालकमंत्री ना.शंभूराज देसाई झाल्याचा जिल्ह्यातील प्रत्येकाला आनंद झाला आहे. मात्र काही जणांनी कायदेशीर चौकट असताना ही कोणतीही परवानगी न घेता फुकटात चमकोगिरी केली होती. अखेर नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने ही चमकोगिरी बॅनरबजी जप्त केली. मात्र नेहमीच चमकोगिरी करण्याची सवयच जडलेल्या या फुकटयांना कायद्याच्या कचाट्यात अडकण्याची गरज आहे.
सातारा शहरातील पोवई नाका ते बॉम्बे रेस्टॉरंट रस्त्यांवर साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या स्वागताचे फुकटची बॅनरबाजी करत ठराविक जणांनी अतीच केले. यावर पालकमंत्र्यांशी पंगा घेण्याचे धाडस नसलेल्या नगरपालिकेने शांततेत घेतले. मात्र रविवार दि.२६ जानेवारी रोजी असं काय घडलं की ते बेकायदेशीर बॅनर जप्त करण्यासाठी नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने धाडस दाखवले.
साताऱ्यात काही जणांना फुकटात चमकोगिरी करण्याची सवयच जडली असून ठराविक नेत्यांचे फोटो लावून हा फायदा घेतला जातो. न्यायालयाने निर्देश दिले, शहरात ठराविक जागा बॅनर लावण्यासाठी निश्चित करण्यात आल्या, ऑनलाईन अर्ज करुन घेण्याची आवश्यकता असून निर्णयानुसार भाडे भरावे लागते. असे असताना इतरांना अक्कल शिकवणारे, नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश देणाऱ्या अधिकाऱ्यांना सातारा शहरातील फुकटच्या बॅनरबाजीला आजपर्यंत रोखण्यात यश आले नाही. हि शोकांतिका सातारकरांना जाणवते.पण सामान्यांना कायदा पण ‘आका’ ला कायद्याच्या पायघड्या, ही साताऱ्याची नवी तऱ्हा आता कायद्याच्या कचाट्यात अडकण्याची गरज आहे.
बेकायदेशीर लागलेले बॅनर सातारा पालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाडसी कारवाई करत चमकोगिरी करणाऱ्या कार्यकर्त्यांचे बॅनर जप्त केले, दरम्यान सातारा पालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या धाडसी कारवाईचे सातारकरांनी भरभरून कौतुक केले….