
सातारा : भाजपचे महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांना प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे. मला विश्वास आहे, सातारा लोकसभा मतदारसंघातील जनता सुज्ञ आहे. मोदींच्या विकसित भारताच्या संकल्पना उदयनराजे भोसले यांच्या कमळ चिन्हावर बटन दाबून एक खासदार प्रचंड प्रमाणात साताऱ्याचे सर्व रेकॉर्ड तोडून विजय होतील, असा विश्वास भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.
भाजपचे महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ विंग येथे प्रचार सभेनंतर पत्रकारांशी बोलताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
बावनकुळे म्हणाले, आता लोकसभेच्या निवडणुका चालू आहेत. विधानसभेच्या निवडणुकीला सहा महिने वेळ आहे. खरं तर डॉ. प्रकाश आंबेडकरांना माहित आहे. काँग्रेस कधीही आंबेडकर परिवाराला सहन करत नाही. काँग्रेसने दोनदा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पराभव केला. एकदा भंडारा तर दुसऱ्यांदा मुंबईमध्ये. त्यामुळे काँग्रेस पार्टी ही बाबासाहेबांच्या विरोधी आहे, परिवाराविरोधी आहे. महाविकास आघाडीमध्ये डॉ. प्रकाश आंबेडकरांना घेतलं नाही. त्यांना सोडून दिलं. त्यामुळे उद्याच्या बाबींवर आज काही चर्चा करणे योग्य नाही. काँग्रेस कधी आंबेडकर परिवाराला सहन करीत नाही.
शशिकांत शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे, त्याबाबत विचारले असता, बावनकुळे म्हणाले, गुन्हा कोणत्या प्रकारचा आहे. कशामुळे गुन्हा दाखल झाला आहे. त्या ठिकाणी गंभीर बाबी समोर आले आहेत. हा तपास यंत्रणेचा भाग आहे. हा राजकीय भाग नाही. जर कोणी राजकीय भांडवल करत असेल तर त्याला लखलाभ आहे. कोणत्याही तपास यंत्रणेला त्या ठिकाणी दबाव आणणे योग्य नाही. याबाबत मला काही माहिती फारशी नाही. त्यावर योग्य ती कारवाई तपासणी यंत्रणा करेल. हा रडीचा डाव नाही. ऑलरेडी ते निवडणुकीत पराभूत झाले आहेत. त्यामुळे आम्हाला रडीचा डाव खेळण्याची आवश्यकता नाही.
लोकसभेची नाशिकची जागा शिवसेनेकडे आहे. भाजप त्या ठिकाणी लढणार नाही. पंकजा मुंडे त्या उद्देशाने म्हटलेल्या नाहीत. प्रीतम मुंडेंना चांगल्या स्थानावर बसवणे, सन्मान करणे ही आमची जबाबदारी आहे. त्याबाबत देवेंद्र फडणवीस पुढाकार घेत आहेत, असे पंकजा मुंडे यांनी केलेल्या वक्तव्यावर बोलत होते.
पुनम महाजन यांना तिकीट न दिल्याच्या प्रश्नावर बावनकुळे म्हणाले, पुनम महाजन यांचा पक्ष योग्य विचार करत आहे. उज्वल निकम यांचा भारतीय जनता पार्टीने योग्य सन्मान केला. मला अभिमानाची बाब आहे की उज्वल निकम लोकसभेत जातील. त्यांचा जो अभ्यास आहे, त्यांनी देशासाठी आतापर्यंत जे काम केले आहे, हे मोदींच्या सरकारमध्ये उज्वल निकम अत्यंत चांगलं काम करतील. नावलौकिक असलेल्या वकील आज भाजपच्या खासदार बनतोय ही अभिमानाची गोष्ट आहे.
सातारा जिल्ह्यातील अजित पवार गटातील कार्यकर्ते नाराज असल्याचे विचारले असता, ते म्हणाले, महायुतीमध्ये काही वेळाने, काही लवकर लोक कामाला लागतात. निवडणुकीला अजून वेळ आहे. एवढ्या वर्षाचं राजकारण आहे. समोरासमोर लढलोय. त्यामुळे वेळ लागतोय.
