सातारा बॉम्बे रेस्टॉरंट ते औद्योगिक वसाहत, प्रतापसिंह नगर, कृष्णानगर परिसरात दहशत माजवणारा दत्ता जाधव हा १० दिवसांपूर्वी तर त्याचा भाऊ युवराज जाधव हा ८ महिन्यांपूर्वी कळंबा मुक्कामातून साताऱ्यात काही अटी शर्ती वर मोका अंतर्गत कारवाईतून सुटले आहेत. मात्र दत्ता जाधव याचा भुरटा मुलगा लल्लन याने अनेक गुन्हे करत कुटुंबाची दहशत अबाधित ठेवली होती.पण गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या काही जणांनी महसुल विभागाच्या जागेवर अनाधिकृत बांधकामे करून बांधलेली घर प्रशासनाने जमीनदोस्त करून दहशत संपवली. त्यात प्रतापसिंह नगरात पोलीस चौकी उभी करून स्थानिक नागरिकांना मोकळा श्वास घेण्यासाठी वातावरण निर्माण केले. १० दिवसांपूर्वी अटी शर्ती वर मोका अंतर्गत कारवाईतून बाहेर पडलेला दत्ता जाधव याने एका सोनाशेठ ला पैशासाठी धमकावले असता, शाहुपुरी पोलीस स्टेशनमध्ये तोंडी तक्रार होताच, त्याला सल्ला देणाऱ्या कायदे पंडीताने सबुरीने प्रकरण हाताळले. मात्र दहशत संपल्याने, कोणीच विचारत नसल्याने बिथरलेल्या दत्ता आणि लल्लन ने पुन्हा दहशत निर्माण करण्यासाठी जुन्या वादातून पै.विक्रम वाघमारे याला थेट जीवे मारण्याची लल्लन ने थेट धमकी दिली. यातून रक्तरंजित संघर्ष होण्याची शक्यता असून पोलीस प्रशासनाने वेळीच यावर कडक आणि धडक कारवाई करण्याची गरज आहे.

अनेकांशी तलवार हल्ला, मारहाण, चाकू हल्ला करून पंगा घेतलेल्या लल्लनने माज केला आहे.त्यातील काही जण त्याला सोडणार नाहीत,हे ओळखून गेल्या काही दिवसांपासून जीवाच्या भितीने जत तालुक्यात हिंडणारा लल्लन हा बाप दत्ता जाधव कळंबा मधून १० दिवसांपूर्वी जामीनावर बाहेर आला आहे. त्याच्या पाठोपाठ प्रतापसिंह नगरात लल्लन ही आला आहे.

दोन दिवसांपासून सावज शोधत असताना मंगळवारी सकाळी सकाळी जुना वाद चव्हाट्यावर आणून पै. विक्रम वाघमारे आणि कुटूंबाला संपवण्यासाठी धमकी आणि दहशत निर्माण केली तर पै.विक्रम वाघमारे याला जीवे मारणार अशी धमकी दिली, याबाबत शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असून आता बापाच्या जागेवर कळंबा मुक्कामी लल्लन ला पोलीस अधीक्षक समीर शेख काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे.

गेली काही महिने शांतता पसरलेल्या प्रतापसिंह नगरात नामचीन दत्ता जाधव मोका अंतर्गत कारवाईत अनेक वर्षे कळंबा मुक्कामी होता. साताऱ्यातील दत्ताला अक्कल शिकवणारा आणि कायदेशीर पाठबळ देणाऱ्या कायदे पंडीताकडून दत्ता जाधव आणि पै.विक्रम वाघमारे यांच्यातील जुना वाद मिटविण्यासाठी धडपड सुरू होती.

वाद मिटवताना ही दत्ता जाधव कसा अबाधित राहील,असा कल कायदेपंडिताचा डाव असफल झाला. यातून पंडितांच्या सल्ल्याने भुरटा लल्लन ने थेट जीवे मारण्याची धमकी देण्याचे धाडस केले. राहण्यासाठी घर नाही, उदरनिर्वाहासाठी काही ही नाही, यामुळे बिथरलेल्या दत्ता आणि लल्लन सध्या पुन्हा दहशत निर्माण करण्यासाठी ॲक्टिव्ह होण्याचा प्रयत्न करत आहेत.

शहर पोलीसांना दत्ताकडून पुन्हा गुन्हा दाखल झाला तर मुक्काम पोस्ट कळंबा याबाबत लेखी इशारा बॉन्ड लिहून घेतला आहे.

मात्र कायदे पंडीताचा सल्ल्याने पुन्हा दहशत निर्माण करण्याचा डाव खेळायला गेलेला दत्ता आणि लल्लन यांच्यावर शहर पोलीसात तक्रार दाखल झाली आहे.

याप्रकरणी आता सातारच्या बड्या नेत्यांनी लक्ष देऊन साताऱ्यात अशांत पसरवणाऱ्या दत्ता, लल्लन यांना कायमची धडा शिकविण्याची वेळ आली आहे. अन्यथा हे नामचीन कुटुंब पैशासाठी वाट्टेल ते करत मुडदे पाडतील.

By Admin

You cannot copy content of this page