सातारा : खाजगी सावकारीला कंटाळून एकाने विषारी औषध प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना सातारा शहरात घडली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शोएब महंमदहसेन शेख याने नागठाणे मधील एका खाजगी सावकाराकडून आपल्या उद्योगासाठी 12 लाख रुपये सुमारे दोन वर्षांपूर्वी घेतले होते. यानंतर शोएब शेख याने वेळोवेळी मुद्दलेसह व्याजाची परतफेड करीत सुमारे 17 लाख रुपये ऑनलाईन व ती सोडून आणखी बरीच रक्कम सावकाराला देण्यात आली होती. मात्र तरीही पैशाला चटावलेला संबंधित सावकार हा शेख यांच्या घरी येवून त्यांच्या परिवारास शिवीगाळ, धमकी देत होता. या कारणास्तव शेख यांच्यासह परिवाराचे मानसिक स्वास्थ्य खराब झाले होते. याच कारणातून त्यांनी विमनस्क अवस्थेत आज दि. 9 जून रोजी त्यांच्या गॅरेजमध्ये विषारी औषध प्राशन केले.

ही घटना एकाने पाहिली असता त्याने इतरांनाही याबाबत माहिती दिली. यानंतर सगळ्यांनी शेख यांना क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असून त्यांच्यावर तातडीने उपचार सुरु करण्यात आले आहेत, अशी माहिती शेख यांच्या नातेवाईकांनी दिली आहे.

By Admin

You cannot copy content of this page