सातारा : धोम वाई खून खटल्यात माफीची साक्षीदार असलेल्या ज्योती मांढरेनेगर्भवती असल्याने जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला आहे.

या जामीन अर्जावर आज न्यायालयात सुनावणी होती. यावर सरकार पक्षाने जामीन देण्यास हरकत नसल्याचे न्यायालयास सांगितल्याने संशयित आरोपी संतोष पोळ याने हरकत घेतली. त्याने ज्योती मांढरेवर अनेक आरोप केले.या खटल्याची सुनावणी वाई येथील अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश मेहेरे यांच्यासमोर सुरू आहे. मागील सुनावणीच्या वेळी ज्योती मांढरेच्या जामीनाची मुदत संपल्याने तिने न्यायालयासमोर शरणागती पत्करली होती. न्यायालयाने तिची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती.

दरम्यान गर्भवती असल्याने स्वत:ची काळजी घेण्यासाठी जामीन मिळावा, असा अर्ज ज्योतीने न्यायालयात केला आहे. ज्योतीच्या जामीन अर्जावर सहाय्यक सरकारी वकील ऍड. मिलिंद ओक यांनी आपली बाजू मांडली. ज्योती मांढरे ही माफीची साक्षीदार असल्याने तिला जामीन देण्यास हरकत नसल्याचे म्हणणे त्यांनी न्यायालयास सादर केले. दरम्यान, मांढरेच्या जामीन अर्जाला संशयित आरोपी संतोष पोळ याने हरकत घेतली. स्वतः आपले म्हणणे मांडताना त्याने मागील जामिनाच्या कालावधीत मांढरेने जामीनाच्या अटी आणि शर्तीचा भंग केला आहे.पुराव्यामध्ये छेडछाड करण्याचा प्रयत्न केला आहे.

कुमारी असताना ही गर्भवती राहू शकत नाही. जामीन मिळविण्यासाठी वेगळे कारण ती न्यायालयास सांगत असल्याचे त्यांने सांगितले. अनेक आरोप करत तिला दुसऱ्यांदा जामीन देण्यात येऊ नये, असे त्याने न्यायालयाला सांगितले.

By Admin

You cannot copy content of this page