सातारा : अवैधरित्या गुटख्याचा साठा केल्याप्रकरणी एकाविरोधात साताराशहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, विविध प्रकारचा पानमसाला विक्रीकरण्यावर बंदी असतानाही तो गुरुवार परज येथे सापडल्याने इरफान जमालखान (वय 42, रा. शनिवार पेठ, सातारा) याच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अन्न सुरक्षा विभागाने याप्रकरणी कारवाई केली आहे. संशयिताकडून 3403 रुपयाचा पानमसाला जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई 23 जुलै रोजीकरण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक जैस्वाल करीतआहेत.

By Admin

You cannot copy content of this page