सातारा : एकदा का वर्दी अंगावर आली की घरदार, नाती, वाढदिवस, सण, जवळच्या लोकांचे समारंभ यांना तिलांजली देवून सच्चा खाकी वर्दीधारी आपल्या कर्तव्याला प्राधान्य देतो. याचेच मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सातारा शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत यादव.

आज दि. 15 ऑगस्ट रोजी त्यांचा वाढदिवस. मात्र, कोणत्याही मोहाला बळी न पडता सगळ्याला मुरड घालून यादव यांनी आपल्या कर्तव्यावर जाणे इष्ट समजले.आज सातारा शहरात सुरु असणार्‍या गणेश मिरवणुकांमुळे सर्वसामान्यांना, वाहनधारकांना कोणत्याही प्रसंगाला सामोरे जायला लागू नये म्हणून यादव यांनी वाहतूक सुरळीत करण्याकडे लक्ष दिले आहे. त्यांच्या मित्रमंडळींना त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी तारेवरची कसरत करीत त्यांना शोधत रस्त्यावर यावे लागत आहेत. त्यातूनच यादव हे शुभेच्छांचा स्विकार करुन वाहतूक नियमनाकडे लक्ष देत आहेत.

खरेच, सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत यादव साहेब, मानली तुमची कर्तव्यनिष्ठा… वाढदिवसाच्या तुम्हाला कोटी कोटी शुभेच्छा!

शुभेच्छुक – विनित जवळकर, सचिन सापते.

By Admin

You cannot copy content of this page