
आज (ता.19 ऑगस्ट 25) महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. रायगड,रत्नागिरी, पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा आणि कोल्हापूर घाटमाथ्यावर रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
पालघर, ठाणे, मुंबई, सिंधुदुर्ग,जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड,लातूर, अमरावती, चंद्रपूर आणि गडचिरोली येथे ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. राज्यातील उर्वरित भागांमध्ये विजांसह जोरदार पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
