
राज्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयातील राज्य आपत्कालीन नियंत्रण कक्षालाआज (मंगळवारी) उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भेट दिली.
मुंबई शहर आणि परिसर तसेचराज्यातील इतर भागात मुसळधार पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीची त्यांनी माहिती घेतली.पावसाच्या तडाख्यात अडकलेल्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी संबधित अधिकाऱ्यांना केल्या.
