सातारा: खटाव तालुक्यातील निमसोड येथील शेळकेवाडीतील श्री मायाक्का, बिरोबा व बाळूमामा देवस्थानच्या विकासासाठी मंत्री जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून प्रयत्न करण्याची ग्वाही भाजपाप्रदेश सदस्या सोनिया गोरे यांनी दिली.

मायाक्कादेवीची वार्षिक यात्रा पारंपरिक उत्साहात संपन्न झाली. यात्रेनिमित्त पालखी मिरवणूक, भंडारा प्रसाद तसेच ढोकळवाडी, गारवडी येथील गजी मंडळाचे गजी नृत्य मोठ्या उत्साहात झाले. ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांच्या पत्नी सोनिया गोरे यांनी उत्सवास भेट दिली.

By Admin

You cannot copy content of this page