सातारा (प्रतिनिधी) : सातारा शहराच्या नगराध्यक्ष पदाचा उमेदवार भाजपच्या बंदल खोट्यातून मुंबईवरून साताऱ्याला येणार आहे .त्यामुळेखासदार उदयनराजे भोसले यांच्यासह सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले या दोन्ही नेत्यांना सर्व मान्य होईल असा कोणता उमेदवाराचे नाव पुढे येणार आहे याविषयी प्रचंड उत्सुकता आहे .सातारा विकास आघाडीच्या वतीने काका धुमाळ व संग्राम बर्गे तसेच नगर विकास आघाडीच्यावतीने नगर विकास आघाडीचे आजी-माजी पक्षप्रतोद अमोल मोहिते व अविनाश कदम यांच्या नावाची चर्चा आहे .यामध्ये सर्व मान्य चेहरा कोण असेल याचे उत्तर येत्या दोन दिवसात मिळणार आहे .

भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यकारिणीने जिल्हा निवडणूक प्रमुख व प्रभारी नेमून प्रत्येक कार्यकर्त्यांची व्यक्तिशः चर्चा करून अहवाल मागवले आहेत .नगराध्यक्ष पदासाठी एकच नाव हे निश्चित केले जाणार आहे .सातारा जिल्ह्याची भाजपची निवडणूक प्रमुख शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी 368 नगरसेवक पदासाठी व 21 नगराध्यक्ष पदासाठीच्या उमेदवारांचा खलिता राज्याचे निवडणूक प्रभारी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे सोपवला आहे .मुख्यमंत्रीपदाची देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून चर्चा होऊन पुढील दोन दिवसांमध्ये अंतिम याद्या आणि नगराध्यक्ष पदाचा अंतिम उमेदवार ठरवला जाणार आहे .साताऱ्याचा नगराध्यक्ष ठरताना ज्येष्ठ बंधू म्हणून उदयनराजे यांना शिवेंद्रसिंह राजे यांनी मान दिल्याची चर्चा आहे .नगराध्यक्ष हा दोन्ही आघाड्यांमध्ये समन्वय ठेवून दोन्ही राजांच्या मार्गदर्शनांतर्गत काम करणारा हवा आहे .सातारा विकास आघाडी मध्ये उदयनराजे भोसले यांचे कट्टर कार्यकर्ते काका धुमाळ व संग्राम बर्गे ही दोन नावे प्रामुख्याने चर्चेत आहेत .काका धुमाळ यांनी उदयनराजे भोसले यांचा सातारा तसेच दिल्ली चा प्रशासकीय कारभार एक हाती सांभाळला आहे .काका धुमाळ यांनी पहिल्यांदाच सर्वसाधारण आरक्षणामुळे नगराध्यक्ष पदासाठी राजकीय महत्त्वाकांक्षा प्रकट केल्या आहेत .काका धुमाळ सातारा विकास आघाडीचा पडद्यामागील घडामोडींचा प्रमुख चेहरा आहे . मूळचे सोनके तालुका कोरेगाव येथील असणारे काका धुमाळ उदयनराजे भोसले यांचे कट्टर समर्थक असून सातारा शहरातच स्थायिक आहेत .कार्यकर्त्यांची अचूक साखळी बनवण्याची ताकद,जबाबदाऱ्यांचे योग्य नियोजन,राजकीय प्रश्नांची अचूक जाण यामुळे काका धुमाळ यांचा पडद्यामागचा चेहरा नगराध्यक्षपदाच्या रेस मध्ये आल्यामुळे अचानक चर्चेत आला आहे .

उदयनराजे भोसले यांचे दुसरे कट्टर उमेदवार संग्राम बर्गे यांनी गेल्या चार वर्षापासून विलासपूर म्हणजे प्रभाग क्रमांक 17 मध्ये जोरदार पायाभरणी केली होती मात्र येथे ओबीसी पुरुष हे आरक्षण पडल्यामुळे संग्राम बर्गे यांनी नगराध्यक्ष पदासाठी मोर्चे बांधणी सुरू केली आहे संग्राम बर्गे हा प्रदेश कार्यकारणीवर असणारा चेहरा संपूर्ण शहरांमध्ये परिचित आहे .गेल्या चार वर्षात वेगवेगळ्या माध्यमातून त्यांनी प्रभागात तब्बल 12 कोटी रुपयांची कामे केली आहेत .सातारा शहराविषयीच्या विकासाची व्हिजन विशिष्ट रोजगाराच्या संदर्भाने इनोव्हेशन सातारा ही संकल्पना त्यांनी राबवत गोडोली येथे आयटी पार्क उभे करण्याच्या संदर्भात त्यांनी प्रचंड पाठपुरावा केला होता .जागांच्या काही तांत्रिक अडचणीमुळे आयटी पार्क हे लिंबखिंडीमध्ये सरकले तरीसुद्धा त्यांनी केलेला पाठपुरावा याचे महत्त्व कमी होत नाही .संग्राम बर्गे यांचा निखळ व्यक्तिमत्व विकासाची व्हिजन आणि दोन्ही महाराजांना सर्वमान्य होईल असा चेहरा आहे त्यामुळे त्यांचे पारडे प्रचंड जड मानले जात आहे.

खासदार उदयनराजे भोसले यांचे तिसरे कट्टर समर्थक माजी उपनगराध्यक्ष किशोर शिंदे यांच्या नावाची ही जोरदार चर्चा आहे .किशोर शिंदे यांनी उपनगराध्यक्ष म्हणून आपल्या कामाचा मागील पंचवार्षिक मध्ये चांगला ठसा उमटवला दोन्ही आघाड्यांमध्ये समन्वय ठेवण्यामध्ये त्यांना चांगले दिवस आले होते .अतिशय शांतपणे प्रश्न ऐकून त्याची तळ लावण्याची क्षमता,विकास निधी आणण्यासाठी मंत्रालयापर्यंत करावा लागणारा पाठपुरावा तसेच कॅबिनेट मंत्र्यांची वेळ घेऊन मंत्रालयात विकास कामांचे करावे लागणारे सादरीकरण यामध्ये किशोर शिंदे वाकबगार आहेत .शुक्रवार पेठ ही सातारा शहराच्या राजकारणाची शक्ती केंद्र समजली जाते .साताऱ्यात समांतरपणे चालणारी सुरुची आणि जलमंदिरे ही राजकीयसत्ता केंद्र शुक्रवार पेठ येथेच आहे .त्यामुळे शुक्रवार पेठेत असणाऱ्या किशोर शिंदे यांना या दोन्ही राजकीय वलयाचा सर्वमान्यतेने फायदा होऊ शकतो .साताऱ्याचा गेल्या अडीच दशकाचा इतिहास हा सातारा विकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाचा राहिलेला आहे .यंदा आघाड्यांचे राजकारण बाजूला ठेवून दोन्ही नेत्यांनी पक्षीय राजकारणाला महत्त्व दिले आहे .त्यामुळे सातारा विकास आघाडी बरोबर नगर विकास आघाडीच्या उमेदवारांची नगराध्यक्ष पदासाठी चर्चा होणे साहजिक आहे

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नगरविकास आघाडीचे पक्षप्रतोद अमोल मोहिते यांच्या नावाची नगर विकास आघाडी कडून जोरदार चर्चा आहे जनता बँकेचे चेअरमन,राजकारण आणि सहकार यामध्ये कार्यकर्त्यांचे घट्ट जाळे ,सातारा शहराच्या विकासाचे व्हिजन ,तसेच दोन्ही नेत्यांशी उत्तम संबंध यामुळे अमोल मोहिते यांच्या नावाची सुद्धा चर्चा आहे .

सातारा विधानसभा संयोजक अविनाश कदम हे नगर विकास आघाडीचे माजी पक्षप्रतोद आहेत त्यांनी प्रभाग क्रमांक 11 मधून जोरदार तयारी केली आहे मात्र अविनाश कदम हा नगर विकास आघाडीचा अत्यंत अनुभवी चेहरा आहे .तब्बल चार टर्म सातारा नगरपालिकेत नगर विकास आघाडीचा अभ्यासू चेहरा म्हणून अशोक मोने यांच्याबरोबर अविनाश कदम यांनी हिरीरीने जबाबदारी सांभाळली आहे.राजकीय चाणाक्षपणा त्यांच्यामध्ये इथ्यभूत आहे. प्रभागामध्ये विकास निधी खेचून आणणे याशिवाय सातारा शहरातील अनेक भविष्यकालीन प्रकल्प त्यांच्याकडे असून त्यांची मांडणी ते नगराध्यक्ष पदाच्या रूपाने करू शकतात. शहराच्या पूर्वेकडील विशेषता गडकर आळी सर्वोदय कॉलनी येथील हद्द वाढ भागातील विकासाला ते न्याय देऊ शकतात तसेच सातारा शहराच्या सर्वांगीण विकासामध्ये अविनाश कदम यांचा चेहरा नगराध्यक्ष म्हणून चालू शकतो असा जनमताचा कौल आहे.याशिवाय सातारा शहरातील प्रश्नांची अभ्यासू आणि आक्रमक मांडणी करणारे रस्त्यावर उतरून काम करणारे नगर विकास आघाडीचे माजी उपनगराध्यक्ष जयेंद्र दादा चव्हाण यांची सुद्धा नाव चर्चेत आहे .उत्तम संघटन कौशल्य आणि नगरपालिकेचा कारभार एक हाती सांभाळण्याची क्षमता शिवाय उदयनराजे व शिवेंद्र सिंह राजे यांच्याशी उत्तम असलेल्या समन्वय की जयेंद्रदादांची खासियत आहे .त्यांच्या नावावर दोन्ही नेत्यांकडून शिक्कामोर्तब केली जाऊ शकते असे . दादा नगर विकास आघाडीचे पहिल्या फळीतील नगरसेवक आहेत

By Admin

You cannot copy content of this page