सातारा,(प्रतिनिधी)- शाहूपुरीलागेल्या 20 वर्षांत चुकीचे नेतृत्व लाभल्यामुळे शाहूपुरीचे मोठे नुकसान झाले असून आता अक्षय जाधव या युवा नेतृत्वाला निवडून देत शाहूपुरीच्या विकासाला गती द्यावी, असे आवाहन मान्यवरांनी केले.

भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार अक्षय जाधव यांच्या प्रचारार्थ शाहूपुरीत आयोजित करण्यात आलेली कोपरा सभेतमान्यवर बोलत होते. सभेला पदाधिकारी आणिनागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्येजयेंद्र चव्हाण, अविनाश कदम, बाळासाहेबखांदरे, विनोद कुलकर्णी, बाळासाहेब गोसावी,भारत भोसले, वैशाली टंकसाळे आणि गौरीगुरव यांसह अनेक मान्यवरांचा सहभाग होता.सभेदरम्यान विरोधी उमेदवार संजय पाटील यांच्या कार्यपद्धती आणि गेल्या कार्यकाळातीलकारभारावर टीका झाली.

अविनाश कदम म्हणाले, अक्षय जाधव यांच्यामार्फत शाहपुरीतआजवर झालेली कामे हा केवळ प्रारंभ आहे.स्विमिंग पूल, वॉकिंग ट्रॅक, क्रीडा विकास,तसेच रस्ते आणि सार्वजनिक सुविधा यामध्येत्यांनी घेतलेली धडपड प्रत्येकाला दिसत आहे.पाच वर्षांत त्यांनी एवढे करू शकत असतील तरनिवडून आल्यानंतर शाहूपुरीचा मोठा कायापालट होणार आहे.

बाळासाहेब खंदारे म्हणाले, शाहूपुरीच्याभविष्यासाठी अक्षय जाधव यांना निवडूनद्या. त्यांच्याकडे व्हिजन आहे. ते पाच वर्षांत शाहपुरीचा चेहरामोहरा बदलून दाखवतील.

बाळासाहेब गोसावी म्हणाले, आमच्याकडून संजय पाटील यांना पुढे आणण्याची चूक झाली. ती आता सुधारायची आहे. शाहूपुरीला दहशतमुक्त करायचे आहे. कुणालाही त्रास होणार नाही, हा माझा शब्द आहे.विनोद कुलकर्णी म्हणाले, ठेवीदारांना चुनालावणाऱ्यांचा या निवडणुकीत १काटा किर्रर्र होणारच. पतसंस्थेच्या जागेत कोट्यवधींचा नुकसानीचा व्यवहार करून आता नगरसेवकपदाचे डोहाळे येतात म्हणजे राखणदार दारात आणि चोर घरात!

अक्षय जाधव म्हणाले, मी तुमच्यातलाचएक आहे. सत्ता नाही तर सेवा करण्याचा हेतू आहे. मला साथ द्या. मी तुमच्यासाठी २४तास उपलब्ध असेन. शाहूपुरीत अजून मोठा विकास करायचे स्वप्न आहे, आणि ते तुमच्या सहकार्यानेच पूर्ण करू.नगराध्यक्षपदाचे उमेदवार अमोल मोहिते यांनीही विकासाची ग्वाही दिली. शहराचा विकास, सुविधा आणि सुरक्षिततेसाठी आम्ही वचनबद्ध आहोत. शाहूपुरीला प्रगत आणि आधुनिक बनवणे हेच आमचे ध्येय आहे, असेते म्हणाले.

By Admin

You cannot copy content of this page