
सातारा : कास रोडवर असलेल्या यवतेश्वर येथील प्रमोद लॉजवर अल्पवयीन युवतीवर जबरदस्ती अत्याचार केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.याप्रकरणी खटाव तालुक्यातील १९ वर्षीय युवकावर पोस्को कलमांतर्गत सातारा तालुका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी,१९ वर्षीय आरोपीने डिसेंबर २०२४ ते एप्रिल२०२५ दरम्यान वेळोवेळी अल्पवयीन युवतीवर अत्याचार केला असल्याची फिर्यादीत नमूद केले आहे. पीडित अल्पवयीन असल्याचे माहिती असून देखील तिला यवतेश्वर येथे लॉजवर घेऊन तिच्यासोबत जबरदस्तीने वारंवार शारीरिक संबंध ठेवले आहेत.
या प्रकरणी पोलिसांनी कलम६४,६४(२) (एम) बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कलम ४,६ नुसार बलात्कार आणि पोस्कोचा गुन्हा दाखल केला आहे. त्यानुसार आरोपीला तालुका पोलिसांनी अटक केली करण्यात आली आहे.अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक गुरव करत आहेत.
