सातारा : सातारा शहरात व जिल्ह्यात नुकतीच शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. त्यानंतर तब्बल चोवीस तासांच्या आत एका युवकावर पोवई नाका परिसरातील 24X7 मेडिकल समोर, म्हणजे हॉटेल गॅलेक्सी बार समोर एका युवकावर धारधार शस्त्राने वार करण्यात आल्याची घटना गुरुवार दि.9 मे रोजी रात्री पावणे एक वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती. हल्लेखोर लगेच पळून गेले तर जखमी झालेल्या युवकास उपचारास जिल्हा रुग्णालयात दाखल केले असून त्या युवकाची प्रकृती मध्ये सुधारणा होत असल्याचे रुग्णालयातुन सांगण्यात आले.

सातारा शहरातील पोवई नाका परिसरात म्हणजे रात्री अपरात्री सुद्धा गजबजलेला परिसर असतो, एकीकडे जीवनदायीनी औषधे तर दुसऱ्या बाजूस मद्यपीसाठी मिळणारी औषधे म्हणजे मध्यालय. अशातच दि. ०९ मे रोजी रात्री १२ : ३० ते १ च्या सुमारास पोवई नाका येथील चोवीस तास मेडिकल तसेच एका मद्यालयासमोर झालेल्या दोन अनोळखी गटांमधील वादामध्ये एका युवकावर धारधार शस्त्राने ( कोयत्याने ) वार झाल्याची घटना घडली. हल्ला करणारे तेथून लगेच पळून गेले तर जखमी झालेला युवक हा रविवार पेठेतील असल्याने त्यास सातारा जिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे, असे जिल्हा रुग्णालयातल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

या घटनेची माहिती मिळताच सातारा शहर पोलिस घटनास्थळी पोहचले. त्यांनी घटनेची माहिती घेतली. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून सातारा जिल्हा पोलिस अधीक्षक समीर शेख यांच्या सूचनेनुसार हल्ला करणाऱ्यांच्या शोधासाठी पथके रवाना झाली आहेत.

आमच्या नव नवीन अपडेट्स पाहण्यासाठी पाहण्यासाठी फॉलो करा आणि सबस्क्राईब करा ” राजमुद्रा न्यूज सातारा”….

By Admin

You cannot copy content of this page