सातारा : सातारा शहरापासून जवळच असलेल्या परळी गावामध्ये श्री रामदास स्वामी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत म्हणजे सज्जनगड या ठिकाणी पुणे, मुंबई, सातारा, तसेच बाहेरगावाहून सुट्टीचे दिवस असल्यामुळे पर्यटक (भाविक) मोठ्या संख्येने येत असतात.तेथे आल्यावर पहिला प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे गाडी पार्किंग करण्याचा या ठिकाणी येथील हॉटेल आणि नाष्टा दुकानदार यांनी सज्जनगड बस स्थानकात चक्क अतिक्रमण करून त्या ठिकाणी आपले दुकान थाटले आहे. आणि त्या दुकानासमोर जर कोणी गाडी पार्किंग केली तर तेथील दुकानदारांच्या रोषाला सामोरे जावे लागते.

अतिशय अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून पर्यटकांना गाडी लावण्यास मज्जाव करणाऱ्या दुकानदारांसोबत अनेकवेळा पर्यटकांची हमरीतुमरी होतं आहे. वेळीस या अशा मुजोर टपरी धारकांना आटोक्यात आणल पाहिजे नाहीतर याचा परिणाम पर्यटन व्यवसायावर नक्कीच होणार..!

याकडे सातारा तालुका पोलीस प्रशासन व श्री.रामदास स्वामी सज्जनगड संस्थान व परळी ग्रामपंचायत विभाग व महाराष्ट्र परिवहन विभाग यांनी लक्ष घातले पाहिजे आणि वाढलेले अतिक्रमण हटवले पाहिजे अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांतून होतं आहे.

By Admin

You cannot copy content of this page