
सातारा- शुक्रवार पेठ येथील कोटेश्वर पाण्याची टाकी मधील हजारो लिटर पाणी वाया ओढ्यातून वाहत आहे. ऐन उन्हाळ्यात नागरिकांना पाणी टंचाई जाणवत आहे नागरिक पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
अनेक दिवसांपासून हजारो लिटर पाणी वाया जात आहे खरं तर जल है तो कल है असे असताना येथे पाणी आहे पण नागरिकांच्या उपयोगी नाही या परिसरातील नागरिक पाण्यासाठी इतरत्र भटकंती करावी लागत आहे तर अनेक जण पाणी विकत घ्यावे लागते नागरिक हतबल झाले आहेत दरवेळी दुरुस्ती चे कारण सांगून प्रशासन नागरिकांची दिशाभूल करत आहेत.

लोकप्रतिनिधीचे ही याकडे दुर्लक्ष झाल्याने नागरिकांना कोणी वाली उरला नाही मतांसाठी दारात येणारे व मोठे आश्वासन देणाऱ्या नी आता पाठ फिरवली आहे कोटेश्वर टाकीतून वाया जाणारे पाणी थांबले पाहिजे तसेच प्रशासनाने डोळे उघडे ठेवून कारभार करावा खरंतर नागरिक संयमाने वागतात त्याचा गैरफायदा प्रशासन घेवु नये एवढीच अपेक्षा आहे.
श्रीरंग काटेकर.सातारा
