सातारा : महिलेस आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी एका युवकावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यातआला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा शहरात वास्तव्यास असलेल्या एका युवतीसोबत महेंद्र प्रकाश गोसावी रा.व्यंकटपुरा पेठ, सातारा याने प्रेमाचे नाटक करुन तसेच तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याबरोबर लग्न न करता तिला नकार देऊन त्याचबरोबर तिला शिवीगाळ व हाताने मारहाण करुन दमदाटी केली. यामुळे संबंधित महिलेने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली आहे.

अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक जगदाळे करीत आहेत.

By Admin

You cannot copy content of this page