सातारा : सातारा शहरात पिसाळलेल्या कुत्र्याकडून अनेक नागरिकांना चावा, विशेषतः यामध्ये सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार घेतलेल्या नागरिकांची संख्या 28 असल्याची माहिती प्राप्त झाली.

याबाबत अधिक महिती आशी की, मंगळवारी सुमारे 7.30 ते 8 वाजण्याच्या सुमारास मोती चौक परिसरात एका तपकिरी रंगाचे कुत्र्याने अचानक नागरिकांना चाव्याला सुरुवात केली, ते पिसाळले असावे अशी शंका नागरिकांना आली. ते कुत्रे चालणाऱ्या तसेच दुचाकी वरून प्रवास करणार्यांना देखील चावा घेऊ लागले. सुरवातीला मोती चौक नंतर हेच कुत्रे पुढे स्टेट बँक, नंतर,मोती तळे, शुक्रवार पेठ असे करत कोटेश्वर कॉलनी पर्यत करंजे कडे गेल्याची माहिती समजते आहे, या बाबत नागिरकामध्ये भीतीचे वातावरण पसरले असून याची माहिती स्थानिक नागरिकांनी पालिका आरोग्य विभागाला दिली.

तसेच याबाबत टीम राजमुद्रा यांनी देखील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये प्रत्यक्ष जाऊन जखमी नागरिकांची भेट घेतली, यावेळी आरोग्य निरीक्षक प्रकाश राठोड हे देखील उपस्थित होते.त्यांनी या गंभीर घटनेची दखल घेतली असून याबाबत आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना सूचना केल्या असून सर्व मुकादम,भागनिरीक्षक यांना सतर्क केले. याबाबत कोणाला कुत्रे आढळून आल्यास तात्काळ संपर्क करण्याच आवाहन केले, या साठी पहाटे पासून आरोग्य विभाग शोधमोहीम करणार असल्याचे राठोड यांनी याबाबत रात्री 12 वाजता जिल्हा शासकीय रुग्णालयात बोलताना माहिती दिली.

By Admin

You cannot copy content of this page