
सातारा : अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी एका शिक्षकावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा शहरातील एका प्रसिद्ध शाळेत खेळाचा शिक्षक असणाऱ्या सौरभ रामचंद्र शर्मा रा. मंगळवार पेठ, सातारा याने शाळेतील एका अल्पवयीन मुलीशी असभ्य वर्तन केल्याप्रकरणी त्याच्या विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक बाबर करीत आहेत.
