सातारा(प्रतिनिधी) – साखर, मैदा, वनस्पती तुपाचे दर सरासरी २० टक्के वाढल्याने बेकरी उत्पादकांनी पदार्थांच्या किंमती वाढविण्याचा निर्णय साताऱ्यातील समृद्धी बेकरी ओनर्स असोसिएशनने जाहीर केला आहे.

कच्च्या मालाची दरवाढ झाल्यामुळे उत्पादीत सर्वच पदार्थांच्या दरात सरासरी १५ ते २० टक्के किंमतीत वाढ केली जाणार आहे. त्यामुळे रु. २५ मिळणारा ब्रेडचा पुडा आता रु.३० ला, खारी रु.२४० ची रु.२८० ते रु.३०० पर्यंत तर टोस्ट , बटर दरात ही जवळपास रू.१५ ते रु. २० दरवाढ झाली आहे.

ऐतिहासिक साताऱ्यात कंदी पेढ्या प्रमाणे बेस्ट टेस्ट असणारे ब्रेड, चॉकलेट टोस्ट , नानकटाई, खारी सारखे बेकरी उत्पादने ग्राहकांना आवडतात.वनस्पती तूप, तेल, मैदा, पीठ या कच्च्या मालाची दरवाढ होऊन ही बेकरी पदार्थ दरवाढ केली नव्हती. आता कच्च्या मालाची १५ ते २० टक्के दर झाल्याने बेकरी पदार्थांच्या दरात ही १५ ते २० टक्के दरवाढ करण्याचा निर्णय समृद्धी बेकरी ओनर्स असोसिएशनच्या बैठकीत एकमताने घेतला असल्याचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी सांगितले.

बेकरी ओनर्स असोसिएशनचे सदस्य असलेल्या ‘न्यू गुडलक बेकरी’ , ‘अरोमा बेकरी’ , ‘डिलाईट बेकरी’, समृद्धी बेकरी, आझाद बेकरी यासह साताऱ्यातील बेकरी मालकांच्या बैठकीत एकमतांनी हा निर्णय मांडला आहे.

By Admin

You cannot copy content of this page