सातारा (14 जानेवारी): मकर संक्रातीच्या पूर्वसंध्येला सातारा शहरालगत असलेल्या पेढ्याच्या भैरोबा डोंगरात एक मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली. सायंकाळी या मृतदेहाबाबत माहिती मिळताच डोंगर उतारावरील घनदाट जंगलात रेस्क्यू टीम दाखल झाली आणि मृतदेह बाहेर काढले.घनदाट जंगलात एका झाडावर लटकलेल्या अवस्थेत हे मृतदेह आढळले प्रथमदर्शी दिसताना हि आत्महत्या असल्याचे दिसते. मात्र हि आत्महत्या की घातपात या बाबत शंका घेण्यास वाव असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान छत्रपती शिवेंद्रराजे रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी अत्यंत परिश्रमाने रात्री नऊच्या सुमारास हे मृतदेह डोंगर पायथ्याला आणले. या बाबत सातारा तालुका पोलिसांशी संपर्क केले असता अद्याप या मृतदेहाची ओळख पटविण्याचे काम सुरू असून या ठिकाणी मिसिंगच्या कंप्लेंटबाबत तपासणी केली जात आहे. अद्याप हि या बाबत जास्त माहिती मिळालेली नाही. मृतदेह उत्तरिय तपासणी शवविच्छेदनासाठी सातारा जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.

हे मृतदेह बऱ्याच दिवसांपासून या ठिकाणी लटकलेले असल्याने ते कुजू लागले होते. त्वचा लटकलेल्या अवस्थेत असून पूर्ण काळी पडलेली होती.सातारा तालुका पोलीस या बाबत अधिक तपास करत असून या संदर्भात कोणास काही माहिती असल्यास सातारा तालुका पोलिसांशी संपर्क करा. असे आवाहन हि पोलिसांकडून करण्यात आले.

By Admin

You cannot copy content of this page