
सातारा : पुरोगामी संघर्ष परिषद ही सामाजिक संघटना महाराष्ट्र व कर्नाटक राज्यामध्ये अन्यायाच्या विरोधात लढा देऊन न्याय देण्याचे काम करत असून आज सोमवार दिनांक २० जानेवारी २०२५ रोजी पुरोगामी संघर्ष परिषदेचे वरिष्ठ प्रदेशाध्यक्ष प्राचार्य बाळासाहेब साठे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने संजीवनी शिक्षण संस्था कराड ता. कराड जिल्हा सातारा मधील शिक्षक कर्मचारी विजयकुमार यशवंत साठे एम. ए. बी. एड. डी.एड.यांचा सेवा जेष्ठतेनुसार मुख्याध्यापक पदावर हक्क असताना त्यांना डावलून इतरांना प्रभारी मुख्याध्यापक म्हणून नेमणूक करत असल्या विरोधात आणि त्यांच्या इतर प्रमुख मागण्यांसाठी सातारा माध्यमिक शिक्षण अधिकारी सातारा यांच्या कार्यालयावर “जवाब दो” आंदोलन केले.
यावेळी वरिष्ठ राज्य उपाध्यक्ष हनुमंत दादा जाधव,महासचिव अर्चना घोरपडे, पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडीच्या अध्यक्षा अश्विनी नवले, वरिष्ठ सातारा जिल्हाध्यक्ष शंकरराव चव्हाण, पश्चिम महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष विकासरावजी सरगडे, किरण खरात माण तालुका अध्यक्ष, सुषमा खरात माण तालुका महिला आघाडीच्या अध्यक्षा, अशोक आडागळे कोरेगाव तालुका अध्यक्ष, बबनराव अडागळे, प्रमोद पाटील, सौ. चवतमहल सातारा शहर उपाध्यक्षा मंदाकिनी घोरपडे इत्यादी पुरोगामी संघर्ष परिषदेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
