सातारा : सातारा-मेढा रस्त्यावरील कोंडवे गावच्या हद्दीत फिल्मी स्टाईलने दुचाकीवरुन गोळीबार केलेली टोळीपसारच आहे. आतापर्यंत तालुका पोलिसांनी एकास अटक करुन न्यायालयात हजर केले असता त्याला तीन दिवसाची कोठडी सुनावण्यात आली आहे. तुषार प्रल्हाद धोत्रे (वय 28, रा. मंगळवार पेठ, सातारा) असे अटक केलेल्याचे व कोठडी मिळालेल्याचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सोमवारी भर दुपारी छमछम कारणातून युवकांमध्ये टोळी युध्द भडकले. गेल्या महिन्यापासून त्याप्रकरणी खदखद सुरु होती. सोमवारी याच कारणातून दुचाकीवरुन दोघांनी दुसऱ्या दुचाकीवरील युवकांवर थेट गोळीबार केला. या गोळीबारीत दोघेजण जखमी असून त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. गोळीबार झाल्यानंतर हल्लेखोर पसार झाले.

सोमवारी रात्री उशीरा तुषार धोत्रे याला तालुका पोलिसांनी अटक केली. हल्ल्याच्या कटात त्याचा सहभाग असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

सातारा-मेढा रस्त्यावरील कोंडवे गावच्या हद्दीत फिल्मी स्टाईलने दुचाकीवरुन गोळीबार केलेली टोळी पसारच आहे. आतापर्यंत तालुका पोलिसांनी एकास अटक करुन न्यायालयात हजर केले असता त्याला तीन दिवसाची कोठडी सुनावण्यात आली आहे.

By Admin

You cannot copy content of this page