
सातारा : कोण गेट-टुगेदर करून तर कोण जेवणावेळी घालून वर्धापन दिन साजरा करतात. साताऱ्यातील कुणबी समाज संघाच्या सदस्यांनी मंगळाई टेकडीवर श्रमदान करत अनोख्या पद्धतीने आपल्या समाज संघाचा 16 वा वर्धापन दिन साजरा केला. कुणबी समाज बांधवांच्या या अनुकरणीय उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
झाडे लावाल तर फळे चाखाल, झाडे तोडाल तर फळे भोगाल असा संदेश देत कुणबी समाज संघाचे कार्यकर्ते सकाळी सात वाजता मंगळाईच्या टेकडीवर जमा झाले. मुळताच अंगी शिस्त, सहकार्य करण्याची वृत्ती आणि काटकपणा असलेल्या कार्यकर्त्यांनी अवघ्या दीड तासात प्लास्टिकच्या कॅन मधून पाणी वाहून नेऊन टेकडीवरील सुमारे १ हजार ६०० झाडांना पाणी घातले.
श्रमदान मोहिमेत कुणबी समाज संघाचे अध्यक्ष भालचंद्र गोताड, राजेंद्र नारकर, ओंकार नारकर, रमेश भिसे, सिताराम नारकर, गोविंद बेलकर, संदेश पडियार, दत्तात्रय चाळके, प्रकाश मराठे, अंकुश मांडवकर, जयराम ठोंबरे, घनश्याम सांडिम, शंकर रेवाळे, राजेंद्र नारकर, सुरेश झेपले, वसंत केसव, वसंत डिके, विष्णू धावडे, सुनील नवरत, संजय झेपले, सुनील पवार, रवींद्र होडे, निलेश कुमठेकर, महेश गराटे, तसेच स्वप्निल कुमार, हरित साताराचे जगदीश कोष्टी, निखिल घोरपडे, अमोल कोडक, संजय मिरजकर, दिलीप भोजने, राजेश पुराणिक सहभागी झाले होते.
