
सातारा: जकातवाडी येथील शारदाताई पवार आश्रम शाळेत अखिल भारतीय मुक्ता साळवी यांच्या सातव्या साहित्य व संस्कृती संमेलन आयोजित प्रसंगी संमेलनाचे अध्यक्ष डॉ शरद गायकवाड मार्गदर्शन करताना पुढे म्हणाले की मी पणा अहंकार गट – तट मनभेद व मतभेद गाढुन सर्व परिवर्तनवादी व पुरोगामी लोक एकाग्र बुद्धिमत्तेचा जीवावर समांतर प्रश्नावरील किमान मुद्द्यावर लोकशाही मार्गाने संघर्ष करूया. सध्याचा प्रतिगामी महाराष्ट्र पुन्हा एकदा पुरोगामी बनवून नोबेलच्या तोलाचे ज्ञानपीठ मोलाचे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना ” भारतरत्न ” देऊन त्यांचा उचित गौरव करण्याची केंद्र सरकारकडे मागणी करून एकविसाव्या शतकात अंधश्रध्दा निर्मूलन, दारिद्र्य निर्मूलन, विषमता निर्मूलन, भ्रष्ट्राचार व्यसनाधीनता, बेरोजगारी आज पर्यंत 30 वर्षातील तीन लाख शेतकर्यांनी आत्महत्या व वाढत्या लोकसंख्येला आळा घालण्यासाठी व महिला व युवतींवर दिवसाढवळ्या वाढत्या अत्याचारातून घडत असलेल्या घटना रोखण्यासाठी समाज मनाची गरज आहे.
सध्याच्या राजकीय वळणार बोलताना गायकवाड म्हणाले गल्ली पासून दिल्ली दिल्ली पर्यंत द्वेषाचे राजकारण चालू असून पोटात मनूस्मृति आणि ओटात संविधान हा कावा ओळखायला हवा हे वेळीच बंद करायला हवे अन्यथा देशाचे ऐक्य अबाधित राहणार नसून या देशाचे तुकडे पडतील.

प्रारंभी पोवई नाक्यावर शिवतीर्थावर वरुण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून राजवाडा मार्गे जकातवाडी या मार्गावरून साहित्यदिंडी आयोजित करण्यात आली. संमेलनाचे उद्घाटन जेष्ठ समाजसेविका अनुराधा भोसले यांनी केले.
मुक्ता साळवी यांचा निबंध व सध्याची सामाजिक सांस्कृतिक परिस्थिती यावर प्राध्यापक प्रकाश नाईक कोल्हापूर व चंद्रकांत खंडाइत यांनी परिसंवाद आयोजित करण्यात आला होता याचे अध्यक्षस्थानी माजी आमदार पद्मश्री लक्ष्मण माने होते.
सचिन बागडे यांनी प्रास्ताविक केले तर सत्यवान कमाणे यांनी स्वागत केले महाराष्ट्र राज्यातील जेष्ठ व युवा साहित्यिक उपस्थित होते.
