निवृत्त कर्मचाऱ्यांचा सन्मान करताना उपमुख्याधिकारी अरविंद दामले, मुख्य अभियंता दिलीप चिद्रे माजी नगरसेवक बाळासाहेब खंदारे व इतर

सातारा:– महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त सातारा नगरपालिकेतील निवृत्त कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. स्वराज्य कामगार संघटनेच्या वतीने कर्मचारी स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात प्रथमच नगरपालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी उपस्थिती लावल्याने खऱ्या अर्थाने कर्मचारी आणि अधिकारी यांच्यातील स्नेह जुळून आल्याचे या कार्यक्रमाच्या निमित्ताने दिसून आले.

सातारा नगरपालिकेचे उपमुख्याधिकारी अरविंद दामले,बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता दिलीप चिद्रे व माजी नगरसेवक तसेच संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब खंदारे यांच्या हस्ते शाल श्रीफळ व मानचिन्ह देऊन निवृत्त कर्मचाऱ्यांना गौरवण्यात आले.

यावेळी आरोग्य विभागातील विभाग प्रमुख प्रकाश राठोड, आरोग्य निरीक्षक सागर बडेकर,प्रशांत गंजीवाले, राकेश गलियाल,गणेश काकडे तसेच स्वराज संघटनेचे उपाध्यक्ष संदीप पाटसुते, शशिकांत कांबळे, प्रकाश नवले, सचिव कपिल मट्टू, संजय वायदंडे, रवींद्र धडचिरे, उपस्थित होते.

सातारा नगरपालिकेच्या इतिहासात प्रथमच कर्मचारी व अधिकारी संघटनेच्या कार्यक्रमात एकत्र आले होते. या अगोदरही कर्मचाऱ्यांसाठी काम करणाऱ्या अनेक संघटना होत्या मात्र कर्मचारी आणि अधिकारी यांच्यात समन्वयाचा अभाव होता. मात्र गेल्या दहा वर्षापासून मुख्याधिकारी अभिजीत बापट, उपमुख्याधिकारी अरविंद दामले,आस्थापना प्रमुख कुलकर्णी मॅडम,मनोज बिवाल तसेच आरोग्य विभागातील आरोग्य निरीक्षक व अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येक अडीअडचणी स्वतः उभे राहिले या अधिकाऱ्यांमुळे कर्मचारी आणि अधिकारी यांच्यामध्ये जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झाले.

त्यामुळे सातारा नगरपालिकेत कर्मचारी व अधिकारी यांच्यात समन्वया मधून कामे होऊ, कर्मचाऱ्यांचे प्रश्न सुटू लागले. यामधून अधिकारी व कर्मचाऱ्यांमधील वाढलेली दरी कमी झाली. असे सांगत कार्यक्रमाच्या निमित्ताने कर्मचाऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. उपमुख्याधिकारी अरविंद दामले म्हणाले की,आजचा कार्यक्रम हा सुखद धक्का देणारा कार्यक्रम आहे. कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा संघटनेचा धोरणात्मक मार्ग अत्यंत चांगला उपक्रम आहे. सातारा नगरपालिकेचे इतिहासात असा मेळावा प्रथमच झालेला आहे. याबद्दल स्वराज्य कामगार संघटनेतील सर्व पदाधिकाऱ्यांचे मी अभिनंदन करतो. कामगार दिनी कामगारांचा सन्मान होतोय हे खूप कौतुकास्पद आहे.यावेळी माजी नगरसेवक बाळासाहेब खंदारे म्हणाले की, तीन वर्षांपूर्वी स्वराज्य संघटनेची स्थापना झाली. सातारा नगरपालिकेतील कर्मचाऱ्यांनी सुरू केलेल्या रोपट्याचे आज वटवृक्षात रूपांतर झाले आहे. त्यांनी मला अध्यक्ष केले मला कामगारांसाठी काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली. याबद्दल मी पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त करतो. कर्मचाऱ्यांच्या एकजूटीमुळे मला काम करण्याची बळ मिळते.

आम्ही कोणतेही काम घेऊन गेलो तर सातारा नगरपालिकेतील अधिकाऱ्यांनी आम्हाला नेहमीच सहकार्य केले. कर्मचाऱ्यांच्या प्रश्नासाठी त्यांनी नेहमीच आम्हाला साथ दिली. कर्मचाऱ्यांच्या प्रश्नासाठी मी नेहमीच उपलब्ध असेन शेवटच्या श्वासापर्यंत मी कामगारांच्या प्रश्नासाठी झटत राहणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

यावेळी आरोग्य निरीक्षक व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केली. सूत्रसंचालन संजय वायदंडे यांनी केले तर आभार प्रकाश नवले यांनी मानले. यावेळी जितेंद्र लाड,विशाल वायदंडे,श्रीकांत दरवेशी,जगन्नाथ धडचिरे,किरण गाडे,अमित चव्हाणउमेश पिसाळ, सचिन आवळे,योगेश धडचिरे सुभाष अडागळे, मिलिंद धडचिरे शेखर कांबळे, महिला कर्मचारी पदाधिकारी, सारिका चौधरी सुनीता वायदंडे,पूजा झावरे,अमृता परिहार,ज्योती विरकायदे,आशा गायकवाड,सुवर्णा चव्हाण,लता भिंगरदेवे,वंदना येवले,अश्विनी बोबाटे तसेच नगरपालिकेतील कर्मचारी व महिला कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

By Admin

You cannot copy content of this page