सातारा : सातारा शहर पोलिसांनी तीन कॅफेंवर छापे मारत पोक्सोसह इतर गुन्ह्यांप्रकरणी नऊ जणांवर कारवाई केली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 6 रोजी दुपारी दोन वाजता राधिका रोडवरील असणाऱ्या ब्लॅक इन कॅफे अँड रेस्ट या ठिकाणी सातारा शहर पोलिसांनी छापा मारला. कॅफेमध्ये पूर्ण बैठक व्यवस्था सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या कक्षेपासून दूर ठेवून तसेच कॅफेमध्ये दरवाजे अपारदर्शक ठेवून अंधार करून येणाऱ्या जाणाऱ्या व्यक्तींचे नोंदणी रजिस्टर न ठेवता कॅफेमध्ये अश्लील कृती करण्यास अप्रेरणा दिल्या प्रकरणी कॅफेचालक सुशांत जितीन धुमाळ रा. करंजे, म्हसवे रोड, सातारा तसेच कॅफेमध्ये अश्लील कृती केल्या प्रकरणी शंतनु संजय गव्हाणे रा. गव्हाणवाडी, ता. पाटण, जि. सातारा आणि सातारा तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या युवतीवर कारवाई करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार इंगवले करीत आहेत.

दुसरी कारवाई सिटी बिझनेस सेंटर येथील आरबी कॅफेवर करण्यात आली. याप्रकरणी कॅफे चालक रोहित गजानन सुतार रा. किन्हई, ता. कोरेगाव जि. सातारा, शेखर संतोष सुतार रा. तासगाव, ता. सातारा आणि सातारा तालुक्यातील एका युवतीवर ही कारवाई करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार भिसे करीत आहेत.

तिसरी कारवाई साईबाबा मंदिरासमोरील कॅफे सातारा या कॅफेवर करण्यात आली. येथे पोक्सोप्रकरणी अल्पवयीन मुलावर कारवाई करत कॅफे चालकावरही कारवाई करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक मोरे करीत आहेत.

By Admin

You cannot copy content of this page