सातारा : सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी किल्ले मोरगिरी, ता. पाटण येथील रविंद्र ज्ञानदेव मिसाळ यास 2 वर्षे सश्रम कारावास आणि 7 हजार रुपये दंडाची शिक्षा कराड येथील विशेष न्यायाधीश दिलीप भा. पतंगे यांनी सुनावली आहे.सन 2023 मध्ये फलटण पोलीस ठाण्यात ग्रामसेवक चंद्रवदन साळुंके यांनी दाखल केलेल्या तक्रारी नुसार कराड विशेष न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाले होते. या कामी अतिरीक्त सरकारी वरिल राजशेखर डी परमाज यांनी सरकार पक्षातर्फे खटल्याचे संपूर्ण कामकाज पाहून हा गुन्हा दोषसिद्धिस नेला. या खटल्यात सरकार पक्षातर्फे एकूण 5 साक्षीदार तपासण्यात आले. यापैकी फिर्यादी आणि तपासी अधिकारी, पाटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक लावंड यांची साक्ष महत्वाची ठरली.

खटल्याची हकीकत अशी, दि 24 मे 2023 रोजी 11.00 वाजता ग्रामसभा होती. त्या ग्रामसभेला कोरम पुर्ण नसल्याने सभा तहकूब करून पुढे ढकलण्यात आल्यामुळे सर्व ग्रामस्थ निघून गेले. फिर्यादी हे ग्रामपंचायतीसमोर उभे असताना आरोपी रविंद्र ज्ञानदेव मिसाळ याने तेथे येवून तुम्ही मला वित्त आयोगाची बँक स्टेटमेंट माहीती का दिली नाही, असे विचारले. तेव्हा फिर्यादी यांनी वित्त आयोगाची माहीती तुमच्या अर्जात नमूद नाही, तरीही मी झेरॉक्स काढून देतो, असे सांगितले. यानंतर आरोपीने फिर्यादीच्या अंगावर धावून जावून त्यांच्या हातातील ग्रामसभा प्रोसेसिंग बुक हिसकावून त्यातील लिहिलेली पाने फाडली व साळुंके यांना शिवीगाळ करून धक्काबुक्की केल्याने पाटण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या खटल्यात अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील आर. डी. परमाज यांनी सरकारतर्फे एकूण 25 साक्षीदार तपासले. यातील तपासी अधिकारी उपविभागीय पोलीस अधिकारी पाटण विभाग विवेक लावंड यांनी या गुन्ह्याचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. ही घटना पाहणारे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार मनोहरलाल वामन अवघडे, पंच श्रीमती गणपत शिदे तपाशी अधिकारी यांच्या साक्षी महत्वाच्या धरून कोर्टात गुन्हा शाबीत झाल्याने आरोपीस अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश क. 2 दिलीप भा. पतंगे यांनी दोषी धरून आरोपी रविंद्र ज्ञानदेव मिसाळ याला 2 वर्षे सश्रम कारावास व 7 हजार रुपये दंड व दंड न भरल्यास 6 महिने साधा कारावास अशी शिक्षा सुनावली. दंडाच्या रकमेतून फिर्यादीस 5 हजार रुपये देण्याचाही आदेश कोर्टाने पारित केला आहे.

या खटल्यात सरकार पक्षातर्फे कोर्ट पैरवी प्रॉसिक्युशन स्कॉड चे कराड कोर्टातील कोर्ट ड्युटीचे पो. कॉन्स्टेबल, प्रशांत. वि. भिंगारदेवे, पाटण पोलिस स्टेशन यांनी सहकार्य केले.

By Admin

You cannot copy content of this page