सातारा : जुन्या भांडणाच्या कारणातून कोडोली परिसरात एकाचा खून झाल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 29 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास जुन्या भांडणाच्या कारणातून अक्षय दिलीप माने रा. धनगरवाडी, ता. सातारा यांचा कोडोली, सातारा येथील पाच एकराच्या मोकळ्या प्लॉटमध्ये धनंजय यादव, प्रथमेश उर्फ पत्या रमेश चव्हाण, योगेश नंदकुमार खवळे, रोहन नामदेव जाधव आणि त्यांचा एक मित्र सर्व रा. कोडोली, ता. सातारा यांनी लाकडी दांडक्याने मारहाण करून खून केला आहे.

खुनाची माहिती समजताच घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले यांनी भेट दिली आहे. संशयितांपैकी तीनजणांना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले असून उर्वरित योगेश नंदकुमार खवळे आणि एकजण फरार आहे. त्यांच्या तपासासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत.

खुनाच्या या घटनेची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बिले करीत आहेत.

By Admin

You cannot copy content of this page