कोयना धरण व कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पावसाचे प्रमाण वाढल्यामुळे धरणातील पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी आज दि. १९ ऑगस्ट २०२५ रोजी सायं ६:०० वा. कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे ११ फुटांवर ठेवण्यात आले होते ते 11 फुटांवरून 12 फुटापर्यंत उघडून ८७,००० क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात सोडण्यात येणार आहे.

कोयना धरण पायथा विद्युतगृहाचे दोन्ही युनिट सुरू असून त्याद्वारे २१०० क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. कोयना नदीमध्ये एकूण ८९,१०० क्युसेक विसर्ग सुरू होईल. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

By Admin

You cannot copy content of this page