
दर महिन्याला उशिरा पगार मिळवणाऱ्या राज्यपरिवहन महामंडळाच्या (एस.टी.) कर्मचाऱ्यांनायंदा गणपतीपूर्वीच वेतन मिळण्याची शक्यताआहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यासाठी पुढाकार घेत पगार फाईल तत्काळ वित्त विभागाकडेपाठवण्याचे आदेश दिले आहेत.
वित्त विभागाकडूननिधी सोमवारी (25 ऑगस्ट) मंजूर झाल्यास कर्मचाऱ्यांना 25 किंवा 26 ऑगस्टला वेतन मिळेल.गेल्या काही महिन्यांपासून वेळेत पगार न मिळाल्यानेकर्मचाऱ्यांमध्ये नाराजी होती. आता सणाआधी वेतन मिळाल्यास त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
