सातारा, दि. 14 (प्रतिनिधी) : सातारा शहरासह तालुक्यात घडलेल्या वेगवेगळ्या घटनांमध्ये तीन जणांनी गळफास घेवून आत्महत्या केल्याच्या फिर्यादी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये दाखल करण्यात आल्या आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सदर बझार, कोयना सोसायटी येथील रहिवासी संतोष शिवशरण कन्नी (वय 39) यांनी दि. 13 रोजी राहत्या घरी लोखंडी अँगलला नायलॉन दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याची माहिती मानतेश मारुती जानी(वय 42) यांनी सातारा शहर पोलिसांना दिली असून अधिक तपास पोलीस हवालदार मेचकर करत आहेत.

दुसर्‍या घटनेत, पाटखळमाथा येथे सचिन वसंत महापुरे(वय39) यांनी दारूच्या नशेत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. त्यांना उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घटनेची माहिती सुनील वसंत महापुरे(वय 42) यांनी तालुका पोलिसांत दिली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

तिसर्‍या घटनेत, खेड येथील अक्काबाईचा मळा येथील नदीच्या कडेला असलेल्या करंजाच्या झाडाला दोरीच्या साहाय्याने नितीन श्रीधर जाधव (वय 56) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. याची फिर्याद उद्धव श्रीधर जाधव (वय 49) यांनी सातारा शहर पोलिसांत दिली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार यादव करत आहेत.

By Admin

You cannot copy content of this page