​सातारा: सातारा पालिकेच्या वर्तुळात सध्या जनहिताच्या कामांपेक्षा ‘कॅमेरा अँगल’चीच जास्त चर्चा रंगू लागली आहे. पालिकेचे सभागृह असो किंवा शहरात होणारे सांस्कृतिक कार्यक्रम, जनतेचे प्रश्न सोडवण्याऐवजी आपली ‘चमकोगिरी’ कशी होईल, यातच काही नगरसेवक मग्न असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

विशेष म्हणजे, काही नगरसेवकाने आता आपल्यासोबत एक खास ‘व्हिडिओ ग्राफर’ किंवा ‘रील्स मेकर’ची फौजच तैनात केली आहे.​सभागृहात चर्चेऐवजी ‘शूटिंग’वर जोर​नगरपालिकेच्या सभांमध्ये शहराच्या पाणीप्रश्नावर किंवा कचरा रस्ते विकासावर अभ्यासपूर्ण बोलण्यापेक्षा, आपण माईकसमोर उभे असताना कॅमेरा योग्य बाजूने धरला आहे की नाही, याकडेच नगरसेवकांचे जास्त लक्ष असते. एखादा मुद्दा मांडताना तो जनतेसाठी किती फायद्याचा आहे, यापेक्षा तो ‘इन्स्टाग्राम’वर किती ‘व्हायरल’ होईल, यासाठी काही नगरसेवकांची धडपड सुरू असते. सभेचे गांभीर्य बाजूला सारून केवळ ‘चमकोगिरी’साठी व्हिडिओ शूट करण्याच्या या प्रकारामुळे सातारकर संताप व्यक्त करत आहेत.​

सांस्कृतिक कार्यक्रमांत ‘रील्स’चा सुळसुळाट​शहरात होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये तर या चमकोगिरीने कळस गाठला आहे. व्यासपीठावर उपस्थित राहण्यापासून ते दिलेला हार स्वीकारण्यापर्यंतच्या प्रत्येक हालचालीचे ‘स्लो-मोशन’ व्हिडिओ बनवले जात आहेत. “काम बोलू देण्यापेक्षा कॅमेरा बोलू द्या,” अशीच काहीशी धारणा या लोकप्रतिनिधींची झाल्याचे दिसते.​निवडणुकीची तयारी की निव्वळ देखावा?​पुढील निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सोशल मीडियावर आपला प्रभाव पाडण्यासाठी ही धडपड सुरू असल्याचे बोलले जात आहे. मात्र, या चकाकीच्या नादात प्रभागातील रस्ता, कचरा, रखडलेली विकासकामे आणि नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष होत असल्याची टीका होत आहे.​नागरिकांचा सवाल: “आमच्या नगरसेवकांकडे प्रश्नांचा पाठपुरावा करायला वेळ नाही, पण रील्स बनवण्यासाठी मात्र तासनतास वेळ उपलब्ध आहे. ही कसली लोकसेवा?”

By Admin

You cannot copy content of this page