
सातारा: “प्रतिनिधी म्हणून निवडून आल्यानंतर केवळ राजकीय पद न मिरवता, नगरसेवकाने खऱ्या अर्थाने समाजसेवक म्हणून जनतेची कामे करावीत,” असे प्रतिपादन आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.
नगरसेवक दिलीप म्हेत्रे यांच्या माध्यमातून लोकहितासाठी सुरू करण्यात आलेल्या पाणपोईच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. वाढत्या उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी, या सामाजिक जाणिवेने दिलीप म्हेत्रे व जागृती विकास सामाजिक संस्थेच्या वतीने शुक्रवार पेठ, प्रतापगंज पेठ, भाजी मंडई परिसर,या ठिकाणी पाणपोईची उभारणी करण्यात आली आहे.
या कार्यक्रमाला परिसरातील अनेक मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने अमर बेंद्रे, रामभाऊ सपकाळ, जयकुमार बेंद्रे, अतुल काटकर, अतुल कांबळे, महेश बेंद्रे, विजय बेंद्रे, गणेश बेंद्रे, सिद्धार्थ निकोडे, चिदंबर काटवटे, आकाश बेंद्रे, क्षितिज बेंद्रे, सिद्धार्थ बेंद्रे, अमोल यादव, अजिंक्य कदम, विश्वास भोईटे, राजन गांधी, कौशिक कुलकर्णी, अभिजीत कुलकर्णी, यांची उपस्थिती होती.
सामाजिक कार्याचे कौतुक
यावेळी बोलताना शिवेंद्रसिंहराजे पुढे म्हणाले की, दिलीप म्हेत्रे यांनी नेहमीच प्रभागातील नागरिकांच्या मूलभूत गरजांना प्राधान्य दिले आहे. उन्हाळ्यात प्रवाशांची आणि स्थानिकांची तहान भागवण्यासाठी घेतलेला हा पुढाकार कौतुकास्पद आहे. या कार्यक्रमासाठी जागृती विकास सामाजिक संस्थेचे अमर बेंद्रे, व सर्व संचालक, सभासद आणि प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करत दिलीप म्हेत्रे यांच्या कार्याला शुभेच्छा दिल्या.
