सातारा : चोरीच्या घटनेची तक्रार देण्यासाठी रिपाइंच्या आठवले गटाचे सातारा शहराध्यक्ष अक्षय कांबळे हे सातारा शहर पोलीस ठाण्यात रविवारी गेले असता त्यांना शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अनिल शिरोळे यांच्याकडून चुकीची वागणूक दिली गेली.

त्यावरुन सामाजिक कार्यकर्त्यास अशी वागणुक तर सामान्याला कशी वागणूक देत असतील त्यामुळे शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अनिल शिरोळे, कॉन्स्टेबल शिंदे, जगताप यांच्यावर पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही फुटेज तपासून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र म्हस्के यांना निवेदनाद्वारे दि. १६ जून रोजी दुपारी दीड वाजता दिला आहे.

By Admin

You cannot copy content of this page