
सातारा : शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली असून पालक व विद्यार्थ्यांची लगबग सुरू झालेली आहे.आपला पाल्य इंग्रजी भाषेत शिकवा यासाठी पालक वर्ग शुल्क भरतो. परंतु, सध्या अनेक शाळेतील शुल्कवाढमुळे पालक वर्ग त्रस्त झाले आहेत.
याबाबत ऑल इंडिया पँथर सेना जिल्हाध्यक्ष आदित्य गायकवाड यांनीसातारा जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलेले आहे. सातारा जिल्ह्यातील अतिदुर्ग व मागास भाग तसेच खेड्यापाड्यात स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, रयत शिक्षण संस्था तसेच स्थानिक पातळीवरती सामाजिककार्यकर्त्यांनी शिक्षण संस्था उभ्या केल्या आहेत. सातारा जिल्हा परिषदेने बहुजन समाजाला शिक्षण मिळावंयासाठी शिक्षण संस्था काढली. कोणतेही आर्थिक व्यवहार न करता समाज सुधारणेचा वसा घेतला. पण,अलीकडच्या काळामध्ये शिक्षणातून पैसा पैशातून उद्योग अशा चक्रात पालक व विद्यार्थी अडकलेले आहेत. सातारा शहराचा विचार केला तर पोतदार स्कूल, शानबाग, मोना स्कूल, , निर्मला कॉन्व्हेंट स्कूल, युनिव्हर्सलस्कूल, गुरुकुल, डेक्कन स्कूल व अशा अनेक इंग्रजी माध्यमाच्या शाळा उभारलेले आहेत. यापैकी काही शिक्षणसंस्था विद्यार्थ्यांना गुणवत्ता नुसार चांगले शिक्षण देत आहेत त्यांचे आम्ही मनःपूर्वक आभार मानतो पण काहीइंग्रजी माध्यमांच्या शाळेतून विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाचे शिक्षण मिळत असले तरी सध्या वाढते शुल्क व आर्थिक भुर्दंड पालकांवर पडत आहे.
या विरोधात ऑल इंडिया पँथर सेनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाईकेदार यांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्हाध्यक्ष आदित्य गायकवाड यांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे.आज सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी श्री नागेश पाटील यांच्याकडे त्याबाबतचे निवेदन दिलेले आहे.
सदरच्या निवेदनाची प्रत सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक व शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या असून या वेळेला ऑल इंडिया पँथर सेनेचे सिद्धार्थ गायकवाड, रोहन कांबळे, आशिष मोरे,अजय कांबळे, मनोज जगताप, अमोल वालेकर, लक्ष्मण पोळ, विजय यादव, सुशांत वायदंडे, रोहित बनसोडे, वरवी प्राधाने आधी ऑल इंडिया पँथर सेनेचे कार्यकर्ते व पालक उपस्थित होते.
याबाबत जिल्हा प्रशासन जिल्हा पोलीस यंत्रणा व शिक्षण विभागाने तातडीने कारवाई न केल्यास सोमवार दिनांक १७ जून रोजी सकाळी अकरावाजता सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आंदोलन केले जाईल. असा इशारा देण्यात आलेला आहे.
